युवा महोत्सवात मातोश्री बयाबाई कदम महाविद्यालयाची दमदार कामगिरी

0
yuva_mahotsav_feature_200kb
Spread the love

नऊ कलाप्रकारांत यश; सुगम गायनात प्रथम क्रमांक

कडेगाव, प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आयोजित ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय, कडेगाव येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. दि. ६ ते ९ ऑक्टोबर दरम्यान फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात पार पडलेल्या या महोत्सवात मातोश्री महाविद्यालयाने नऊ कलाप्रकारांत यश मिळवत आपली वेगळी ओळख निर्माण केली. सुगम गायनात प्रथम क्रमांक मिळवून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

या महोत्सवात सुमारे २६० महाविद्यालयांनी ३६ कलाप्रकारांत सहभाग घेतला होता. महाविद्यालयाने ३६ पैकी एकूण १७ कलाप्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मातोश्री महाविद्यालयाने सुगम गायनात प्रथम, शास्त्रीय गायन व मेहंदीमध्ये द्वितीय, भारतीय समूहगीत, पथनाट्य व लघुनाटिकेत तृतीय, पोस्टर व नाट्यसंगीतात चतुर्थ, तर सांस्कृतिक शोभायात्रेत पाचवा क्रमांक मिळवला. यापूर्वी सांगली जिल्हास्तरीय युवा महोत्सवात महाविद्यालयाने सांघिक सर्वसाधारण फिरता चषक पटकावला होता. जिल्हास्तरावरील यशानंतर मध्यवर्ती युवा महोत्सवातील या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “स्पर्धेत सहभागी होऊन विजेतेपद मिळाले नाही, म्हणजे अपयश आले असे नव्हे; तर स्पर्धेत सहभागच न घेणे हे खरे अपयश आहे. विद्यार्थ्यांनी बौद्धिक, सांस्कृतिक आणि क्रीडा सारख्या विविध उपक्रमांमध्ये  उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या कलागुणांना अभिव्यक्तीची संधी दिली पाहिजे.”

या महोत्सवासाठी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. शीला मोहिते, आय.क्यू.ए.सी समन्वयक डॉ. महेश माळी, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. मच्छिंद्र कुंभार, डॉ. जयंत विधाते, प्रा. वहीदा शेख, प्रा. नीता शिंदे आणि प्रा. रूपाली येवले यांनी सहभागी २६ विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन व सहकार्य केले.

या यशाबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, संस्थेचे सर्व पदाधिकारी  यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी-कलाकारांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *