युवा महोत्सवात मातोश्री बयाबाई कदम महाविद्यालयाची दमदार कामगिरी
नऊ कलाप्रकारांत यश; सुगम गायनात प्रथम क्रमांक कडेगाव, प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात भारती विद्यापीठाच्या मातोश्री...
नऊ कलाप्रकारांत यश; सुगम गायनात प्रथम क्रमांक कडेगाव, प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात भारती विद्यापीठाच्या मातोश्री...
नऊ कलाप्रकारांत यश; सुगम गायनात प्रथम क्रमांक कडेगाव, प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आयोजित ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय, कडेगाव येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. दि. ६ ते ९ ऑक्टोबर दरम्यान फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात पार पडलेल्या या महोत्सवात मातोश्री महाविद्यालयाने नऊ कलाप्रकारांत यश मिळवत आपली वेगळी ओळख निर्माण केली. सुगम गायनात प्रथम क्रमांक मिळवून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या महोत्सवात सुमारे २६० महाविद्यालयांनी ३६ कलाप्रकारांत सहभाग घेतला होता. महाविद्यालयाने ३६ पैकी एकूण १७ कलाप्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मातोश्री महाविद्यालयाने सुगम गायनात प्रथम, शास्त्रीय गायन व मेहंदीमध्ये द्वितीय, भारतीय समूहगीत, पथनाट्य व लघुनाटिकेत तृतीय, पोस्टर व नाट्यसंगीतात चतुर्थ, तर सांस्कृतिक शोभायात्रेत पाचवा क्रमांक मिळवला. यापूर्वी सांगली जिल्हास्तरीय युवा महोत्सवात महाविद्यालयाने सांघिक सर्वसाधारण फिरता चषक पटकावला होता. जिल्हास्तरावरील यशानंतर मध्यवर्ती युवा महोत्सवातील या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “स्पर्धेत सहभागी होऊन विजेतेपद मिळाले नाही, म्हणजे अपयश आले असे नव्हे; तर स्पर्धेत सहभागच न घेणे हे खरे अपयश आहे. विद्यार्थ्यांनी बौद्धिक, सांस्कृतिक आणि क्रीडा सारख्या विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या कलागुणांना अभिव्यक्तीची संधी दिली पाहिजे.” या महोत्सवासाठी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. शीला मोहिते, आय.क्यू.ए.सी समन्वयक डॉ. महेश माळी, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. मच्छिंद्र कुंभार, डॉ. जयंत विधाते, प्रा. वहीदा शेख, प्रा. नीता शिंदे आणि प्रा. रूपाली येवले यांनी सहभागी २६ विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन व सहकार्य केले. या यशाबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी-कलाकारांचे अभिनंदन केले.
विटा (प्रतिनिधी) : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन मानून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली....
: जिल्हा बँकेसाठी राधिका बागल यांचा उमेदवारी अर्ज दाखल; महिला सर्वसाधारण गटातून अर्ज शिवसेनेचा अधिकच्या जागांवरील दावा प्रबळ विटा : सांगली...
: कडेगाव येथे २८ ऑक्टोबरपासून पहिली आंतरराष्ट्रीय परिषद : ‘जागतिक अभिजात भाषा आणि साहित्यातील संशोधन’ विषयावर देश-विदेशातील अभ्यासकांची उपस्थिती कडेगाव,...
विटा प्रतिनिधी, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांच्या 139 व्या जयंतीनिमित्त विटा हायस्कूल व संजय...
विटा | प्रतिनिधी विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत...
विटा प्रतिनिधी विट्यातील अभ्यासू पत्रकार विजय लाळे यांनी लिहिलेल्या 'महाराष्ट्र पोल्ट्री उद्योगाची सुवर्णपाने' या पुस्तकाला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद लाभला...
विटा, प्रतिनिधीमहाराष्ट्र सिंचन सुधार कार्यक्रमांतर्गत खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील ९ तलावांचा समावेश करण्यात आला असून, यासाठी तब्बल ५२ कोटी रुपयांचा...
: भाजपला राम- राम...देवकर ' काँग्रेसवासी ': सांगली जिल्हा काँग्रेसच्या प्रवक्तेपदी मनोज देवकर: जिल्ह्यात काँग्रेसला येणार अच्छे दिन विटा, प्रतिनिधीखानापूर...