कर्मवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त विटा हायस्कूलची भव्य शोभायात्रा

0
Vita_Highschool_200KB-2
Spread the love

विटा प्रतिनिधी,

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांच्या 139 व्या जयंतीनिमित्त विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनिअर कॉलेज विटा तसेच बळवंत महाविद्यालय विटा यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा)यांच्या प्रतिमेची शोभायात्रा दिनांक 22 सप्टेंबर रोजी संपूर्ण विटा शहरातून काढण्यात आली .

या शोभायात्रेच्या पूर्वी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेची पूजन रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे माजी चेअरमन मा.माधवराव (दादा) मोहिते,सुभाष (बापू) पाटील, बळवंत महाविद्यालयाचे प्राचार्य श्री चंद्रकांत बोबडे व विटा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री हणमंत जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी स्कूल कमिटी सदस्य श्री उत्तमराव पवार, श्री दत्तात्रय शितोळे तसेच नगरसेवक अविनाश शितोळे ,पत्रकार सिराजभाई शिकलगार उपमुख्याध्यापक काळे सर पर्यवेक्षक माने सर, पर्यवेक्षिका रास्कर मॅडम उपस्थित होते.

जयंतीनिमित्त विटा शहरात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये विविध प्रकारच्या भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये भांगडा नृत्य, लाठीकाठी, टिपरी नृत्य, झांज पथक, हलगी, डान्स पथक, प्रादेशिक नृत्य, ढोल पथक, तसेच बळवंत कॉलेजचे एनसीसी पथक अशा अनेक प्रकारची पथके शोभायात्रेमध्ये सहभागी झाली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले,सावित्रीबाई फुले, डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) व सौ लक्ष्मीबाई पाटील (वहिनी) यांची हुबेहूब वेशभूषा करून विद्यार्थी या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते.

शोभा यात्रेच्या प्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आल्यानंतर विद्यालयातील चिमुकल्यांनी आपल्या विविध कलागुणांचे त्या ठिकाणी प्रदर्शन केले तेथे विटा व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. सदर शोभायात्रा विद्यालयात परतल्यावर विद्यार्थ्यांना अल्पोपाहार देण्यात आला आणि त्यानंतर लगेच विद्यार्थ्यांनी विद्यालयांमध्ये आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन केले त्यानंतर विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली ही शोभायात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार कॉलेजचे सर्व सेवक तसेच बळवंत कॉलेज चे सर्व सेवक उत्साहाने सहभागी झाले होते. विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री.हणमंत जाधव सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *