सांगली जिल्ह्यात देवकर यांच्यावर मोठी जबाबदारी; काँग्रेसला येणार अच्छे दिन…

0
file_0000000005508208a03b4f157eac2936
Spread the love


: भाजपला राम- राम…देवकर ‘ काँग्रेसवासी ‘
: सांगली जिल्हा काँग्रेसच्या प्रवक्तेपदी मनोज देवकर
: जिल्ह्यात काँग्रेसला येणार अच्छे दिन

विटा, प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील अभ्यासू युवा नेते  मनोज देवकर यांनी भारतीय जनता पक्षाला राम – राम करत पुन्हा एकदा घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस पक्षाने देखील त्यांचा सन्मान करत देवकर यांची सांगली जिल्हा काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड जाहीर केली. जिल्हाध्यक्ष माजी आ. विक्रम सावंत यांच्याहस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले.

सांगली जिल्हा काँग्रेसच्या प्रवक्ते पदी निवड झाल्यानंतर मनोज देवकर यांचा सत्कार करताना श्री विनय भंडारे, सुरेश पाटील व अन्य मान्यवर.

देवकर यांनी यापूर्वी खानापूर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. आ. गोपीचंद पडळकर, वैभव पाटील आणि अमरसिंह देशमुख यांचे जवळचे मानले जाणारे देवकर यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली असून, आता त्यांच्यावर जिल्हा प्रवक्ते पदाची जबाबदारी आल्याने खानापूर मतदारसंघात काँग्रेस पक्ष वाढवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. एक उच्चशिक्षित, अभ्यासू पत्रकार आणि चळवळीतील कार्यकर्ता असलेल्या मनोज देवकर यांच्या घरवापसीमुळे खानापूर तालुक्यासह सांगली जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा अच्छे दिन येणार, अशा भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *