पत्रकार विजय लाळे यांचा धमाका चर्चेत | पहा, नेमकं घडलंय काय ?

0
Feature_Image_1200x630
Spread the love

विटा प्रतिनिधी

विट्यातील अभ्यासू पत्रकार विजय लाळे यांनी लिहिलेल्या ‘महाराष्ट्र पोल्ट्री उद्योगाची सुवर्णपाने’ या पुस्तकाला संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद लाभला आहे. अशातच आता पत्रकार विजय लाळे यांनी ‘ गोल्डन पेजेस ऑफ महाराष्ट्रा’ज पोल्ट्री इंडस्ट्री’ या इंग्रजी पुस्तकाचे डिजिटल प्रकाशन करत आणखी एक सुखद धमका केला आहे. या पुस्तकाचे ‘डिजिटल प्रकाशन आज पोल्ट्री क्षेत्रातील अग्रणी सी. वसंतकुमार सेट्टी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दै. पुढारीचे निवासी संपादक सुरेश गुदले आणि जोगेश्वरी शिक्षण संस्था, खरसुंडीचे अध्यक्ष किशोर पुजारी उपस्थित होते.

विटा : पुस्तकाचे प्रकाशन करताना सी. वसंतकुमार, सोबत उत्तमराव चोथे, बाबासाहेब मुळीक, आबासाहेब गुळवणी, किशोर पुजारी,सुरेश गुदले, गजानन सुतार, विजय लाळे आदी

गोल्डन पेजेस..’ पुस्तकामुळे पोल्ट्री फार्मिंग च्या प्रश्नांवर सरकारचे डोळे उघडतील : सी वसंतकुमार

सी. वसंतकुमार म्हणाले, गोल्डन पेजेस ऑफ महाराष्ट्रा ’ज पोल्ट्री इंडस्ट्री’ या पुस्तकामुळे विट्याचा पर्यायाने महाराष्ट्राचा पोल्ट्री फार्मिंगच्या इतिहासाबरोबरच त्यांचे प्रश्न जगाच्या पटलावर मांडले गेले, त्यामुळे आता तरी सरकारचे डोळे उघडतील. ते म्हणाले, विट्याचा पर्यायाने महाराष्ट्राच्या गेल्या पन्नास वर्षातल्या पोल्ट्री उद्योगाचा आढावा घेणारी लेखमाला पुढारीने केली. आमच्या क्षेत्राला पत्रकारांनी वेळोवेळी सहकार्य केले. पूर्वीपासूनच इथल्या पत्रकारांनी या विषयावर बातम्या देऊन सरकारी धोरण तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली. बर्ड फ्ल्यू चा काळ असो किंवा त्या नंतरचा, अंडी किंवा खाद्य दरवाढीबाबत सातत्याने आमच्या लोकांबरोबर पत्रकार मंडळी राहिली आहेत. आता सरकारचे पोल्ट्रीबाबतचे धोरण हे कथनी वेगळी आणि करणी वेगळी अशा स्वरूपाचे दिसते, त्यावर सडेतोड लिहिणे गरजे आहे असेही सी वसंतकुमार म्हणाले.

माणदेशी साहित्यिकात भर पडली..

सुरेश गुदले म्हणाले, वास्तविक पोल्ट्रीबाबत मला फक्त अंडी खाण्या इतकीच माहिती होती. परंतु विट्याचा पोल्ट्री उद्योग लेखमालेमुळे व्याप्ती आणि समस्या समजल्या. आम्ही त्या आमच्या परीने मांडल्या. त्यातूनच या पुस्तका ची प्रेरणा पुढे आली. आता डाळींब, यंत्रमाग, गलाई व्यव साय यावरही पुस्तक व्हावे, तसेच फिक्शन लेखन ही करावे अशी अपेक्षा ही गुदले यांनी व्यक्त केली. किशोर पुजारी यांनी माणदेशाला साहित्याची एक परंपरा आहे, त्यात आता आणखी एकाची भर पडली. कोणत्याही गोष्टीं चे दस्तऐवजी करायचे झाले तर त्याचा उपयोग पुढच्या पिढीला होतो. तसेच अधिकृताही मिळते. आता पोल्ट्री सारखेच आता आटपाडी च्या डाळींबावरही विजय लाळे यांनी पुस्तक लिहावे असे मतही पुजारी यांनी मांडले.

बाबासाहेब मुळीक यांनी प्रस्ताविकात विट्या च्या पोल्ट्री व्यवसायाचा आढावा घेत सी वसंत कुमार यांनी विट्याचा हा व्यवसाय वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तर गजानन सुतार यांनी पुस्तक निर्मितीचा इतिहास सांगत यापुढे ही आपण लिहिणाऱ्या लोकांच्या मागे कायम उभा राहू असा शब्द दिला. यावेळी पोल्ट्री व्यावसायिक आबासाहेब गुळवणी, सुखदेव पाटील, विनोद गुळवणी, आनंदराव पाटील, दिनेश देशमुख, सुधीर कुलकर्णी, विनय भंडारे, विवेक भंडारे, उत्तमराव चोथे, दैनिक ऐक्य चे दीपक दीक्षित, मनोज देवकर, युवराज इनामदार, आर.आर. पाटील, शुभम कुमावत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन विटा तालुका नगरवाचनालयाने केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *