अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जत येथे संजय आवटे यांचे व्याख्यान

0
file_00000000c29c8211ba1fce52e1db048c
Spread the love

जत प्रतिनिधी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त जत येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते, लेखक तथा दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे यांच्या व्याख्यानासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता जत-अथणी मार्गावरील शोभा मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी संजय आवटे यांचे व्याख्यान होणार असून विविध क्षेत्रांत लौकिक मिळविलेल्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी जलसंपदा मंत्री आ. जयंतराव पाटील राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सांगलीचे खासदार विशालदादा पाटील, माजी कृषी व सहकार मंत्री तथा आ. विश्वजित कदम, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक तथा माजी मंत्री महादेव जानकर आणि तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक-अध्यक्ष अनिल भीमराव जाहीर उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, माजी सभापती सुरेशराव शिंदेसरकार, सुजय (नाना) शिंदे, अॅड. विद्याताई मोटे, प्रकाश जमदाडे, मन्सूरचाचा खतीब, मोहन कुलकर्णी, तम्मनगौडा रविपाटील, अमोल डफळे, महादेव पाटील, विवेक कोकरे, नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

प्रशासकीय व पोलिस अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तीप्पेहळळीचे माजी सरपंच प्रतापराव तात्यासाहेब शिंदे आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांच्यासह अविनाश वाघमारे, विशाल कांबळे, संजय कांबळे, अॅड. युवराज निकम, अतुल कांबळे, आर.पी.आय. प्रदेश कार्याध्यक्ष संजय कांबळे, नगरसेवक संतोष कांबळे, बाजी केंगार, प्रकाश देवकुळे, दीपक शिंदे, आकाश बनसोडे, प्रशांत ऐदाळे, विजयराजे चव्हाण, राहुल वाघमारे आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *