झील इंटरनॅशनल स्कूलचे स्केटिंग स्पर्धेत घवघवीत यश


सांगली (प्रतिनिधी) : चंद्रपूर येथे दि . ११ व १२ ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या ५ व्या महाराष्ट्र राज्य
म्युझिकल चेअर स्केटिंग  स्पर्धेमध्ये झील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून घवघवीत यश संपदित केले.

या स्पर्धेमध्ये झील इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता ९ वीची विद्यार्थिनी कुमारी अर्पिता कुंभार(१७ वर्ष वयोगट) हिने स्पीड रेस व म्युझिकल चेअर या दोन्ही स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. इयत्ता ४ थीचा विद्यार्थी कुमार रोनक पटेल (१२ वर्ष वयोगट) याने स्पीडरेस मध्ये द्वितीय व म्युझिकल चेअर यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. दोन्ही विद्यार्थ्यांचा 15 ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. महावीर अक्कोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा प्रमुख अभिनंदन गारे , स्केटिंगचे शिक्षक अभय टाकवडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेतील इतर क्रीडा मार्गदर्शक यांचेही सहकार्य लाभले.या दोन्ही खेळाडूंचे झील इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर संजय महाडिक यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मेघाली नरगच्चे व शाळेचे समन्वयक श्री.अभय भिलवडे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *