सांगली (प्रतिनिधी) : येथील लोकनेते मा. हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श माध्यमिक विद्यामंदिर, विटा (भवानीनगर) या १७ वर्षांखालील मुलींच्या खो – खो संघाने अत्यंत नेत्रदीपक कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मिरज येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सांगली आणि भानु तालीम संस्था , मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडल्या.
या स्पर्धेत आदर्श माध्यमिक विद्यामंदिर, विटा या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाचा पहिला सामना कवठेमहांकाळ तालुक्या विरुद्ध झाला. या सामन्यामध्ये १ डाव १२ गुणांनी विजय मिळवला. सेमी फायनल मिरज तालुक्या विरुद्ध झाली, या सामन्यामध्ये १ डाव ९ गुणांनी आदर्शच्या संघाने विजय मिळवला. तर अंतिम सामन्यात
आदर्शच्या संघाने वाळवा तालुक्याच्या संघावर १ डाव ३ गुणांनी विजय मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या संघांमध्ये अक्षदा सुहास शिंदे, सेजल विजय जाधव, सानिका लक्ष्मण सुडके, श्रेया कैलास चव्हाण, श्रेया गणपतराव तामखडे, श्रावणी रामहरी तामखडे, शिवानी अंकुश बुरंगे, वैष्णवी श्रावण चाफे, वैशाली संतोष खुपकर, विद्या भानुदास तामखडे, रेश्मा संपत चव्हाण, नंदिनी नागेश गडदरे, धनश्री विठ्ठल तामखडे, आरती जगन्नाथ तामखडे, स्वप्नाली रामहरी तामखडे या खेळांडूनी भाग घेतला.
या सर्व खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक श्री दत्ता पाटील, श्री समीर माने, श्री कदम ए. बी., श्री दिपके पी. पी. यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक ॲड. सदाशिवराव भाऊ पाटील , संस्थेचे अध्यक्ष ॲड. वैभव पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक पी. टी. पाटील व मुख्याध्यापक सुभाष धनवडे यांनी केले.