विट्यात शिवसेनेच्या दोन उमेदवारांचा अर्ज दाखल, रणधुमाळी सुरु

विटा : ॲड. भालचंद्र कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आ. सुहास बाबर व अन्य.

: भालचंद्र कांबळे आणि प्रा. लीला भिंगारदेवे मैदानात

विटा; प्रतिनिधी

विटा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्यावतीने दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भालचंद्र विश्वनाथ कांबळे यांनी प्रभाग क्रमांक १३ मधून तर लीला रामचंद्र भिंगारदेवे यांनी प्रभाग क्रमांक ९ मधून उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी स्वतः आ. सुहास बाबर उपस्थित होते. भालचंद्र कांबळे हे कायद्याचे पदवीधर आहेत. तर लीला भिंगारदेवे या पीएचडी, एम. फिल. पदवी संपादित केलेल्या प्राध्यापक आहेत. विटा नगरपालिकेचे निवडणुकीसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातून दोन उच्चविद्याविभूषित उमेदवार देण्यात शिवसेनेने आघाडी घेतली आहे.

विटा : प्रा. लीला भिंगारदेवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे, रामचंद्र भिंगारदेवे, शेखर भिंगारदेवे, प्रकाश भिंगारदेवे व अन्य.

आज भालचंद्र कांबळे व लीला भिंगारदेवे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना आ. सुहास बाबर, माजी नगरसेवक महेश कदम, माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे, कन्हैयालाल पवार, प्रकाश भिंगारदेवे, शेखर भिंगारदेवे, महेशदादा भिंगारदेवे, श्रेयस कांबळे, रामचंद्र भिंगारदेवे, मंथन मेटकरी, गौरव कांबळे, आदींसह गांधीनगर , फुलेनगर, बजरंग नगर, नेहरूनगर, मायक्कानगर, कदमवाडा, घुमटमाळ आदी परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमचे नेते स्वर्गिय आ. अनिलभाऊ बाबर यांच्या माध्यमातून आ. सुहास बाबर व  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली विटा शहरात न भुतो न भविष्यती विकासकामे झाली आहेत. या कामांच्या जोरावर आम्ही या निवडणुकीस सामोरे जात आहोत. आम्हाला शंभर टक्के विजयाचा विश्वास आहे, अशी खात्री भालचंद्र कांबळे व लीला भिंगारदेवे यांनी व्यक्त  केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *