विटा ( प्रतिनिधी) : येथील विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून नाभिक समाजाला शुक्रवारच्या आरतीचा बहुमान देण्यात आला. याप्रसंगी विट्याचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर, नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, श्रीधर जाधव, राजू जाधव, संजय गायकवाड, महादेव गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर म्हणाले, नाभिक समाजाला विट्याचा राजा मंडळाने आज महाआरतीचा मान दिला, ही केवळ परंपरेची नव्हे तर सामाजिक ऐक्याची जपवणूक करण्याची पावले आहेत. प्रत्येक समाज घटकाला सन्मानाने स्थान मिळाले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. आज महिला आणि पुरुष दोघांच्याही डोळ्यांत आनंद पाहून आम्हालाही अभिमान वाटला. पुढील काळातही अशा उपक्रमातून समाजातील एकोपा व बंधुभाव वृद्धिंगत करण्याचे कार्य सुरू ठेवू,” असे अध्यक्ष अमोल दादा बाबर यांनी यावेळी सांगितले.
विट्याच्या राजाच्या महाआरतीचा मान दिल्यामुळे नाभिक समाज बांधवांनी मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर, कार्याध्यक्ष आ. सुहास बाबर व पप्पू कदम यांचे आभार मानले. विट्याचा राजा मंडळाने दिलेला हा सन्मान आम्हाला आत्मविश्वास देणारा आहे. समाजातील प्रत्येक घटकाला समानतेने स्थान देण्याचा हा एक मोठा संदेश आहे, असे मत यावेळी नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, श्रीधर जाधव यांनी व्यक्त केले.

यावेळी संजय गायकवाड, महादेव गायकवाड, संदीप साळुंखे, अशोक काळे, संपत गवळी, जालिंदर गवळी, तुकाराम धारेकर, गजानन गायकवाड, माजी सरपंच हेमंत सुर्यवंशी, सम्राट गायकवाड, योगेश गायकवाड, राहुल गायकवाड, अजित काशीद, विनोद काशीद, बबलू काशीद, वैभव काशीद, उद्धव कदम, रवी कदम, प्रकाश गायकवाड उपस्थित होते.