अमोल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त निसर्ग फाउंडेशनचा अनोखा उपक्रम

0
file_0000000027b081fdab5d1e829639dec0
Spread the love

लेंगरे येथे १९ ऑगस्ट सत्कार सोहळा : : वाढदिवस निमित्ताने निसर्ग फाउंडेशनचा विशेष उपक्रम

विटा, (प्रतिनिधी)

विटा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. श्री. अमोलदादा अनिलभाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त निसर्ग फाउंडेशन, लेंगरे यांच्यावतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

हा सत्कार सोहळा बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शेठ च. ग. शहा विद्यामंदिर, लेंगरे, ता. खानापूर, जि. सांगली येथे उत्साहात पार पडणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्या भावी वाटचालीस प्रेरणा देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री. बंडोपंत राजोपाध्ये, सांगली जिल्हा परिषद सदस्या डॉ. सौ. शीतलताई बाबर, मनिषाताई बागल, आदर्श जि.प. सदस्य व सहकार्यवाह, निसर्ग फाउंडेशन फिरोजभैय्या शेख, खानापूर पंचायत समिती सदस्या पायलताई कदम, सरपंच सौ. लक्ष्मीबाई शिंदे, उपसरपंच ऐजाज देसाई जेष्ठ अर्थतज्ञ प्रा. संजय ठिगळे, नायगाव मनपा माध्यमिक विद्यालयाचे प्रा. आप्पासाहेब बागल यांची उपस्थिती लाभणार आहे.


कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सिव्हिल सर्जन व निसर्ग फाउंडेशनचे कार्यवाह, डॉ. विक्रमसिंह कदम यांनी सांगितले की शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या कर्तृत्वाला दाद देण्याची निसर्ग फाउंडेशनची ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा केवळ त्यांच्या यशाचा गौरव नसून, इतर विद्यार्थ्यांनाही मेहनत, जिद्द आणि सातत्याने यश संपादन करण्याची प्रेरणा देणारा उपक्रम ठरणार आहे.

निसर्ग सखी मंच अध्यक्षा डॉ. वैशाली हजारे संस्थेचे सचिव श्री. नानासाहेब मंडलिक, अध्यक्ष नितीन चंदनशिवे, यांनी या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *