: युवा नेते सुहास बाबर यांची माहिती
विटा ( प्रतिनिधी ) : खानापूर मतदारसंघातील तासगाव तालुक्यातील हातनूर ग्रामीण रुग्णालय बांधण्याकरिता शासनाकडून 25 कोटी 23 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली.
बाबर म्हणाले, आमदार अनिलभाऊ यांनी कोव्हीड या महाभयंकर साथीच्या रोगानंतर मतदारसंघातील लोकांच्या आरोग्याच्याबाबतीत अतिशय जागरूक राहून आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवली होती. तासगाव तालुक्यातील हातनूर या गावातिल लोकांना चांगल्या उपचारासाठी तासगाव किंवा विटा या ठिकाणी जावे लागत होते व या गावाच्या आसपास बऱ्याच वाड्या वस्त्या आहेत तेथील लोकांना यामुळे बऱ्याच गैरसोयीचे होत होते परिणामी पेशंट दगावण्याची भीती होती तेथील लोकांची गरज ओळखून आमदार अनिलभाऊ यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार करून मागणी केली होती त्याचा पाठपुरावा युवक नेते सुहास बाबर यांनी घेऊन आजरोजी 30 खाटांचे अद्यावत रुग्णालय बांधण्यासाठी 25 कोटी 23 लाख मंजूर करण्यात यश आले असल्याची माहिती सुहास बाबर यांनी दिली.
यावेळी बोलताना बाबर म्हणाले की कोव्हीड काळानंतर लोकांनी आरोग्याच्या बाबतीत सजग राहणे अतिशय गरजेचे आहे, विशेष करून महिला वर्गांच्या बाबतीत आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी दिसून येतात व त्या ईलाज करण्यासाठी चालढकल करतात किंवा निष्काळजी राहतात त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा गंभीर आजाराचा सामना करावा लागतो ,तर इथून पुढील काळात मतदारसंघातील प्रत्येक आरोग्य केंद्रावर याबाबत चा सविस्तर अहवाल मागवून त्याबाबत योग्य त्या सूचना तालुका आरोग्य अधिकारी यांना दिल्या आहेत.
हातनूर या गावात ग्रामीण रुग्णालय झाल्यामुळे परिसरातील लोकांना याचा चांगला फायदा होणार आहे. त्यामध्ये तज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित नर्स आणि ब्रदर, अद्यावत आणि सुसज्ज अशी आरोग्य तपासणी मशिनरी व भव्य अशी इमारत 30 बेडसह उपलब्ध होणार आहे. यामुळे या भागातील लोकांचा वेळ व त्रास वाचणार आहे. याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,आरोग्य मंत्री तानाजी सावंत,यांचे सहकार्य लाभले असल्याची माहिती सुहास बाबर यांनी दिली.