खानापूर मतदारसंघातील ४६ गावे डोंगरी विभागात; विकासाला गती

शासनाचा निर्णय : सुहास बाबर यांचे यश

सांगली (प्रतिनिधी) : खानापूर मतदारसंघातील 46 गावांचा डोंगरी विभागात समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे डोंगराळ आणि दुर्गम भागातील गावांचा सर्वांगीण विकास करण्यास मोठा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती, सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली आहे.

सुहास बाबर म्हणाले, खानापूर मतदारसंघातील डोंगराळ आणि दुर्गम भागातील गावांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाने या गावांचा समावेश डोंगरी विभागात करावा अशी मागणी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये केली होती. या मागणीच्या पूर्ततेसाठी गेली अनेक महिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मतदार संघाचे विकासासाठी आणखी मोलाचे सहकार्य करत शासन स्तरावर दुष्काळी खानापूर मतदारसंघातील 46 गावांचा डोंगरी उपगट तालुक्यात समावेश केला आहे.
शासनाच्या  निर्णयामुळे या 46 गावांमध्ये डोंगरी विभाग विकास कार्यक्रम यामधून विकास कामांसाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध होणार आहे.

डोंगरी उपगट तालुक्यात समाविष्ट करण्यात आलेली खानापूर मतदारसंघातील गावे पुढील प्रमाणे आहेत.

खानापूर तालुका : बेणापुर, धोंडेवाडी, भुड, घोटी खुर्द मादळमुठी, भडकेवाडी, बलवडी, खानापूर, हिवरे, जाधववाडी, देवीखिंडी, रेवनगाव, मेंगणवाडी, पळशी, रेणावी, घोटी बुद्रुक, ताडाचीवाडी, कुर्ली, बानुरगड.

आटपाडी तालुका : आवटेवाडी, कामत, कानकात्रेवाडी, चिंचाळे,  घरनिकी, घानंद, विभूतवाडी, जांभुळणी, धावडवाडी, नेलकरंजी, पारेकरवाडी, बाळेवाडी, मानेवाडी, मिटकी, तळेवाडी, हिवतड या गावांचा समावेश आहे.

तासगाव तालुका: खुजगाव, बस्तवडे, डोंगरसोनी, विजयनगर, बिरणवाडी पेड, वडगाव  कचरेवाडी गौरगाव खा. धामणी, लोकरेवाडी, धोंडेवाडी या गावांचा समावेश डोंगरी उपगट तालुक्यात करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *