राजकुमार सावळवाडे यांना मनसेची मोठी जबाबदारी; सांगली जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव

आष्टा (डॉ. तानाजी टकले ) : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आष्टा शहर अध्यक्ष, सिल्वर स्टार अर्बन निधी बँकेचे संचालक राजकुमार सावळवाडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी नुकतेच राजकुमार सावळवडे यांना निवडीचे पत्र दिले.

आष्टा येथील राजकुमार सावळवाडे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून मनसेचे आष्टा शहराध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. इस्लामपूर विधानसभा मतदार संघ, वाळवा तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षसंघटन  वाढवण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत.
तरुणांचे, जेष्ठाचं संघटन करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढवण्याच प्रयत्न केला आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी सावळवाडे यांच्या आष्टा शहर मनसे कार्यालयाचे उद्घाटन केले होते. राज ठाकरे यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. मनसेच्या माध्यमातून त्यांनी आष्टा शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. शहरात मनसे पक्ष भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच युवकांचे संघटन आणि सांगली जिल्ह्यामध्ये पक्ष वाढीसाठी योगदान देऊ, असे मत राजकुमार सावळवाडे यांनी व्यक्त केले आह.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *