भाजप कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांच्या घरोघरी जाऊन मदतकार्य करावे; आ. गाडगीळ यांचे आवाहन

सांगली, (प्रतिनिधी): सांगली शहरासह सांगली विधानसभा मतदारसंघातील पूरग्रस्त भागामधील नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, तसेच जिल्हा प्रशासन, तसेच  महापालिका तसेच ग्रामपंचायत प्रशासनामार्फत असलेल्या पूरग्रस्तांच्या स्थलांतर आणि मदतीच्या कार्याला गती द्यावी, असे आवाहन आ. सुधीर गाडगीळ यांनी केले.

सांगली : पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी भारतीय जनता पक्षाने तातडीची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. यावेळी माजी खास. संजयकाका पाटील, आम.  सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सांगलीतील पूरग्रस्तांना सर्वोत्परी मदत करण्यासाठी आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली.  या बैठकीस माजी खा. संजयकाका पाटील, आम. सुधीर गाडगीळ, समन्वयक शेखर इनामदार, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार संघटनमंत्री मकरंदभाऊ देशपांडे, शेखर  इनामदार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


आम. गाडगीळ म्हणाले, पूरग्रस्तांची राहण्याची, जेवणाची, औषध उपचारांची काटेकोर व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र जिथे प्रशासनाची मदत पोचणार नाही तिथे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पूरग्रस्तांपर्यंत आपली मदत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहावे. नदीच्या पाण्याची पातळी सध्या कमी जास्त होत आहे. मात्र संकट पूर्णपणे दूर होईपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घेऊन पूरग्रस्त नागरिकांना दिलासा दिला पाहिजे, असे आवाहन आ. गाडगीांनी यांनी केले.

या बैठकीस माजी आमदार दिनकरतात्या पाटील,  अश्रफ वांकर, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य धीरज सूर्यवंशी, जिल्हा प्रवक्ता मुन्नाभाई कुरणे, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, महिला मोर्चा अध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, प्रकाशतात्या बिरजे, विश्वजीत पाटील, दीपक माने, माजी नगरसेवक युवराज बावडेकर, अविनाश मोहिते, श्रीकांततात्या शिंदे, तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *