सांगली ( प्रतिनिधी ) : सांगलीचे लोकप्रिय शोले स्टाईल पत्रकार आणि महापालिकेचे ब्रँड अंबेसिडर दीपक चव्हाण यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अवयवदान करण्याचा संकल्प केला आहे. आमदार सुधीर गाडगीळ आणि सिव्हिल सर्जन डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या उपस्थितीत दिपक चव्हाण यांनी अवयव दान करण्याचा संकल्प करीत अवयवदानबाबत शोले स्टाईल दुचाकी वरून जनजागृती सुरू करण्याची घोषणा केली.
27जुलै रोजी दीपक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सिंगिंग स्टार म्युजिक स्टुडिओ कडून माळी चित्रमंदिर हॉल येथे कराओके गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एक कार्यक्रमास सांगली मिरज आणि परिसरातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक बहारदार आणि 90 च्या दशकातील सुपरहिट गाण्यांमुळे या कार्यक्रमाची रंगत वाढली.
या कार्यक्रमात स्वतः दीपक चव्हाण, मिलिंद बनसोडे, आशा शेटे, कौसर मुजावर, आशा पवार, सॅम कुरणे, दिशा मोहनानी, राजश्री मोहनानी, जयश्री मद्रासी, विशाल कांबळे, प्रेम वाघमारे, प्राजक्ता वाघमारे, रफिक भालदार, दिपक कांबळे, सुकुमार कांबळे, आरिफ शेख , संगीत सितारे ग्रुपचे प्रमुख शक्ती वर्धन आणि अश्विनी सुर्यवंशी, सुनील पाटील आणि संतोषी झंवर आदी गायक कलाकारांनी बहारदार गाणी सादर केली. मुक्तार कलावंत यांच्या साऊंडने कार्यक्रमाची रंगत वाढविली.
या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, सिव्हिल सर्जन डॉ. विक्रमसिंह कदम, भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री स्वाती शिंदे, पूर्व मंडल अध्यक्षा रुपाली अडसुळे, अनुसूचित जाती मोर्चाच्या स्नेहजा जगताप, रुपाली देसाई, भाजपा युवानेते अतुल माने, सॅमसन तीवडे युवा मंचचे सॅमसन तिवडे, काँग्रेस सेवादलाचे संतोष पाटील, अमोल कणसे, पत्रकार तानाजी जाधव, चंद्रकांत गायकवाड, आप्पा पाटणकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मालपाणी, प्रसाद अडसुळे, ए वन न्यूजचे अहमद शेख, इमरानभाई , आदिल कच्छी, नशा ए मोसकीचे फहीम खान, कल्याणी कुलकर्णी, जेष्ठ गायक जोशी सर, विभूते सर, मंजूर अली , सागर मोहनानी यांच्यासह शहरातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.
यावेळी बोलताना दीपक चव्हाण यांनी अवयव दान चळवळ अधिक तीव्र केली जाईल असे सांगत स्वताच्या अवयव दाणाचा संकल्प केला. कार्यक्रमाचे संयोजन प्रेरणा चव्हाण, राहुल चव्हाण, अयुब ऐनापुरे, किरण गायकवाड, पूजा चव्हाण, मेघा गायकवाड, ओंकार गायकवाड, धनश्री गायकवाड आदींनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी वाढदिवसानिमित्त केक कापून दीपक चव्हाण यांचा वाढदिवस मान्यवरांनी साजरा केला. यावेळी आरोग्यम् हर्बल सेंटर कडून मेघा घोरपडे यानी आरोग्य तपासणी कॅम्प लावला होता.