झुंझार शिंदे आष्ट्याचे झुंझार नेते; झुंझारराव पाटील यांचे गौरवउद्गार


आष्टा : वाळवा (डॉ तानाजी टकले ) लोकनेते स्व विलासराव शिंदे यांच्या परिसस्पर्शाने शहराच्या राजकीय, सामाजिक सहकार,  कृषी  क्षेत्रात, झुंझारराव शिंदे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी उपेक्षित दुर्लक्षित नागरिकांना न्याय मिळवून दिला. आष्टा शहराच्या राजकीय घटनांचे ते साक्षीदार आहेत, असे प्रतिपादन आष्ट्याचे माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील यांनी केले.

आष्टा येथील शिवाजीराव पाटील नागरी सहकारी पत संस्था, शिवाजीराव पाटील आप्पासार्वजनिक वाचनालय, झुंझाररावपाटील युवा मंच यांच्या वतीने माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष झुंझारराव शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी झुंझारराव पाटील बोलत होते.  सुभाष देसाई, सौ. सुमित्रा शिंदे, राजलक्ष्मी शिंदे, ज्ञानीशा शिंदे, धैर्यशील शिंदे, डॉ. वंदना पाटील, साईनाथ पाटील, दिपक शिंदे, अंकुश मदने, महेंद्र बीरभक्त, अविनाश विरमद्रे,प्रदीप ढोले , बाजीराव खाडे उपस्थित होते.

झुंझारराव पाटील म्हणाले, झुंजारराव शिंदे हे आष्टा शहराच्या राजकीयपटलावरील झुंजार नेते आहेत. १९८६, १९९१,१९९६.२००६ या चार पालिका
निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. १९८६, २००६ साली पालिकेत बिनविरोध निवडून आले.  २००१ साली दादा आष्टा शहराचे थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले. ते एकही निवडणूक हरले नाहीत. आष्टा अर्बन बँकेत त्यांनी वीस वर्षे संचालक म्हणून काम केले. जायंटस ग्रुप ऑफ आष्टाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. शिंदे मळा शेतकरी विकास मंचाची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवले. १९९६ पासून आजपर्यंत आष्टा शहर विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत. सिध्देश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन म्हणून काम पहात आहेत. झुंझारराव शिंदे म्हणाले, वडील लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व काकासो शिंदे,भाऊ मा. आ.स्व.विलासराव शिंदे यांच्या साथीने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात वाटचाल केली.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *