विटा लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी संजय पवार; उपाध्यक्षपदी रामदास देवकर

: सचिव पदी लायन श्री प्रसाद कलढोणे तर खजिनदार पदी मनोज वाघमोडे यांची निवड

विटा (प्रतिनिधी) :  लायन्स क्लब ऑफ विटा गोल्ड च्या नूतन सदस्य तसेच पदाधिकारी यांचा पदग्रहण व शपथविधी सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी एमजेएफ लायन मंगेश भाई दोशी, एम जे एफ लायन सुहास निकम, डॉक्टर अलोक नरदे,लायन अली अकबर बिरजादे रिजन चेअरमन व लायन  संजय मालानी झोन चेअरमन या सर्व प्रमुख मान्यवरांनी नवीन सदस्यांना तसेच पदाधिकाऱ्यांचा शपथविधी घेतला व लायन्स क्लब याविषयी व त्याच्या कार्याविषयी सखोल माहिती दिली.

लायन्स क्लब ऑफ विटा गोल्ड चे संस्थापक अध्यक्ष लायन किरण कलढोणे यांनी कार्यकालात राबवलेले उपक्रम याविषयी माहिती सांगितली. तसेच मावळते अध्यक्ष  रोहित पवार सर यांनी मागील वर्षी राबवलेल्या उपक्रमाची तसेच कार्यक्रमांची माहिती प्रमुख पाहुणे तसेच उपस्थिताना दिली.

त्यानंतर 2025 26 या नवीन वर्षासाठी नवीन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा झाला. त्यामध्ये लायन संजय पवार यांची अध्यक्षपदी, लायन रामदास देवकर यांची उपाध्यक्षपदी, लायन प्रसाद कलढोणे यांची सचिव पदी तर लायन मनोज वाघमोडे यांची खजिनदार पदी निवड करण्यात आली. लायन चे नूतन अध्यक्ष लायन संजय पवार यांनी या वर्षातील आपली कार्य व उद्दिष्टे यांची रूपरेषा सर्वांसमोर सांगितले.प्रमुख उपस्थित लायन अली अकबर पिरजादे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी लायन किरण कलढोणे,लायन रोहित पवार, लायन डॉक्टर दत्तात्रय भगत, लायन ज्योती साळुंखे, लायन विकास निकम, लायन डॉक्टर गिरीश शरणाथे, लायन डॉक्टर भरत देवकर, लायन डॉक्टर अमोल तारळेकर, लायन डॉक्टर अक्षय बापट, लायन महेश जी शानबाग, लायन सौ मंजिरी गुळवणी, लायन अबिद भाई शेख, लायन लक्ष्मण कदम, लायन शरद नलवडे तसेच इतर नूतन सदस्य व परिवार  यांची उपस्थिती लाभली.शेवटी आभार लायन रोहित पवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *