नांद्रे – वसगडे येथील शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवा; पृथ्वीराज पवार यांची मागणी


सांगली (प्रतिनिधी) : रेल्वे दुहेरी करणामुळे बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेऊन तातडीने सोडवावेत, अशी मागणी भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पै. पृथ्वीराज पवार व महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस  अॅड. स्वातीताई शिंदे यांनी केली आहे.

याबाबत माहिती देताना पृथ्वीराज पवार म्हणाले, रेल्वे दुहेरीकरणासाठी संपादित झालेल्या शेत जमिनीमुळे अनेक समस्या निर्माण झाले आहेत. आज त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन अडचणी समजून घेतल्या आहेत. त्यानंतर या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा भूमापन अधिकारी गायकवाड यांच्याशी देखील चर्चा झाली आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांना दिलासा देणारा तोडगा लवकरच काढण्यात येईल.

पृथ्वीराज पवार म्हणाले, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे दुहेरीकरणाचा प्रकल्प शासनाने तत्परतेने केला आहे. परंतु विकास करताना कोणावरही अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे. त्यामुळे दुहेरीकरण करताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत. त्यांच्या अडीअडचणी देखील अधिकाऱ्यांनी समजावून घेतल्या पाहिजेत.

पुणे व सातारा जिल्हा येतील भुमी अधीग्रहण करते वेळी वापरलेले निकष हे सांगली मध्ये पण लागु केले जावेत. शेतकरी हे आपल्या हक्काची जमिनीला कायमचे मुकणार असुन त्यांचे हक्काचे संरक्षण करणे हे प्रशासन व सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. रेल्वेचे जमिन अधीग्रहणाचे धोरण हे कायमच अडमुठे राहीले आहे त्यांनी त्यांचा गरजेपेक्षा आधिकची जागा अतिक्रमण केली आहे. शेतकऱ्यांना मात्र हे अतिक्रमण काढणे व पुन्हा ह्क्काचा मोबदला मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.  यासाठी शेतक-यांनी अनेक टोकाची आंदोलने केली . ५ तास रेल्वे अडवली, सलग ६ दिवस पाण्यात ऊभे राहुन जल समाधी आंदोलन केले. परंतु याबाबत शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता व्यापक प्रमाणात लढा उभारणार आहोत, अशी माहिती पृथ्वीराज पवार आणि स्वाती शिंदे यांनी दिली आहे.

यावेळी महिला आघाडी जिल्हा शहराध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हेमलता मोरे, माजी नगरसेविका अप्सरा वायदंडे, कामगार महिला मोर्चा आघाडीच्या शैलजा कोळी, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष स्मिता भाटकर, स्नेहल जगताप, मनीषा सातपुते, वैशाली शेळके, अरुणा बाबर आदी उपस्थित होते

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *