सांगलीच्या पूर पट्ट्यातील अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात सोडावे : वैभव पाटील

विटा ( प्रतिनिधी ) : सातारा आणि सांगली जिल्ह्यातून कृष्णा नदीच्या पात्रातून वाहून जाणारे पुराचे अतिरिक्त पाणी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील तलावात सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन वैभव पाटील यांनी त्यांना निवेदन दिले.


या निवेदनात म्हटले आहे,  चालू वर्षी  सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा, वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन या नद्यांच्या काठावरील गावात पूर परिस्थिती निर्माण होत आहे. त्या परिसरातील जनजीवन विस्कळीत होत आहे. त्याचबरोबर मनुष्य व प्राण्यांचे जीवन धोकादायक बनत आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रशासनाने या धरणातून वाया जाणारे पाणी दुष्काळी पट्ट्यात फिरवले असता दुष्काळी भागात पाण्याचा तुटवडा भासणार नाही आणि नदीकाठच्या गावात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही. त्यामुळे हे अतिरिक्त पाणी सांगली जिल्ह्यातील पूर्व भागात सोडले असता त्या ठिकाणचा शेतकरी वर्ग सुद्धा समाधानी होऊन पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा निकालात निघणार आहे.

त्याचबरोबर नदीकाठच्या लोकांना ही त्रास होणार नाही. प्रशासनावर सुद्धा ज्यादा बोजा पडणार नाही. तरी पुराचे पाणी खानापूर, आटपाडी, जत परिसरात फिरवावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडे केली असल्याचे वैभव पाटील यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *