सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष पदी ॲड. बाबासाहेब मुळीक यांची निवड झाल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केली आहे. या निवडीनंतर ॲड. मुळीक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. परंतु खानापूर मतदारसंघात मात्र प्रमुख चारही नेते महायुती सरकारच्या घटक पक्षात सामील झालेले आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी खानापूर मतदारसंघासह जिल्ह्याची जबाबदारी ॲड. बाबासाहेब मुळीक यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
ॲड. मुळीक हे कायदे तज्ञ असून राजकारणातील मुरब्बी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. पक्षाने त्यांना जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवतानाच खानापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीचा संभाव्य उमेदवार म्हणून देखील पाठबळ दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ॲड. मुळीक खानापूर मतदार संघातून विधानसभेच्या मैदानात उतरणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ॲड. मुळीक यांची ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,
आम. सुमनताई पाटील, आ. अरूण अण्णा लाड, आ. मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, मावळते अध्यक्ष अविनाश पाटील, चिमणभाऊ डांगे, बाळासाहेब पाटील, सुरेश शिंदे, तालुका अध्यक्ष मन्सूर खतीब, हणमंतराव देशमुख, किसनराव जानकर यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.