स्पर्धा परीक्षेतील पदांचा वापर लोक कल्याणासाठी व्हावा : विद्याताई शिंदे


आष्टा (डॉ तानाजी टकले) : अलीकडच्या काळात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप वाढली आहे. स्पर्धा परीक्षेकडे फॅशन म्हणून न्हवे तर पॅशन म्हणून पहिले पाहिजे, पदातून पैसा मिळवणे याकडे नं पाहता अधिकाराचा वापर लोककल्याणासाठी झाला पाहिजे. आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, सातत्य, असेल तर यश मिळतेच, असे प्रतिपादन  विद्याताई शिंदे यांनी केले.

राजाराम शिक्षण संस्था, आष्टा संचलीत युवा कृती फाउंडेशन, अभ्यास केंद्र आष्टा ची विद्यार्थिनी कुमारी अनुराधा रमेश हाके, अंकिता गायकवाड यांची पुणे जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक (कॅनॉल इन्स्पेक्टर) पदी तर शीतल कराडे हिची मोजणीदार पदी, अशुमती झांबरे  हिची महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षक क्लास 2 यांच्या स्पर्धा परीक्षेतून निवडी झाल्या. तसेच शकुंतला हिरूगडे, अंकुश ढोले यांची मंत्रालय सहायकपदी निवड झाली आहे. यानिमित्त  आयोजित सत्कार समारंभात विद्याताई शिंदे बोलत होत्या.

निवड झालेल्या विध्यार्त्यांचा सत्कार राजाराम शिक्षण संस्थेचे प्राचार्य विशाल शिंदे यांच्या हस्ते झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.  विद्याताई शिंदे म्हणाल्या स्पर्धा परीक्षेचा मार्ग खडतर असला तरी करियर च्या दृष्टीने सुखकर आहे. यश मिळतेच मात्र सातत्य, सराव, निर्णय क्षमता महत्वाची आहे.

राजाराम शिक्षण संस्थेने परिसरातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू केली आहे. या अभ्यासिकेचा  लाभ घ्यावा, असे आवाहन विशाल शिंदे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला विश्वराज शिंदे, इंद्रजित हिरुगडे, सागर माने , प्रा शहाजी पाटील, उत्कर्ष माने, सुनीता घोरपडे, युवाकृती फाऊंडेशनचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *