भिलवडी, किर्लोस्करवाडीत तात्पुरते अतिरिक्त रेल्वे थांबे; संजयकाकांच्या प्रयत्नाला यश


सांगली ( प्रतिनिधी ) :  सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांमध्ये काही रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. त्या अनुषंगाने सांगली, भिलवडी, किर्लोस्करवाडी व ताकारी या रेल्वे स्टेशनवर ज्या रेल्वे गाड्या थांबत नाहीत त्या गाड्यांना पुराच्या काळात तात्पुरता थांबा देण्याची विनंती रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णवना केली होती. या मागणीनुसार भिलवडी, किर्लोस्करवाडीत अतिरिक्त रेल्वे थांबे देण्यात आल्याची माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे.

सांगली रेल्वे स्टेशनवर निजामुद्दीन-यशवंतपुर संपर्क क्रांति व चंडीगड-यशवंतपुर संपर्क क्रांति गाड्यांचा थांबा तसेच किर्लोस्करवाडी व भिलवडी येथे बेंगलोर- अजमेर एक्सप्रेस, बेंगलोर- गांधीधाम एक्सप्रेस, बेंगलोर- जोधपुर एक्सप्रेस व मैसूर- अजमेर एक्सप्रेस या 5 गाड्यांचा थांबा द्यावा व ताकारी येथे महाराष्ट्र एक्सप्रेस व कोयना एक्सप्रेसला द्यावा ही विनंती माजी खासदारांनी रेल्वे मंत्रालयाकडे होती. त्या अनुषंगाने रेल्वे मंत्र्यांनी भिलवडी व किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर बेंगलोर-अजमेर एक्सप्रेस, बेंगलोर-गांधीधाम एक्सप्रेस, बेंगलोर-जोधपुर एक्सप्रेस व मैसूर-अजमेर एक्सप्रेस या 5 रेल्वे गाड्यांना थांबा मंजूर करण्यात आलेला आहे.

तसेच ताकारी रेल्वे स्टेशनवर महाराष्ट्र एक्सप्रेस व कोयना एक्सप्रेस या 2 रेल्वे गाड्यांचा थांबा मंजूर केला आहे.
सांगलीत देखील दोन्ही संपर्क क्रांती या गाड्यांना पुरा परिस्थितीत तात्पुरता थांबा मिळण्यासाठी माजी खासदार प्रयत्न करत आहेत. बऱ्याच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना भिलवडी, किर्लोस्करवाडी व ताकारी येथे थांबा मिळाल्यामुळे पुरात सापडलेल्या पूरग्रस्त लोकांना महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व राजस्थान जाण्यासाठी मोठी मदत होणार आहे.  पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सांगली जिल्ह्यातील 3 रेल्वे स्थानकांवर ता 6 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवल्यामुळे सांगली जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी संघटनांनी माजी खासदार श्री संजयकाकांचे आभार मानले आहेत.

प्रवाशांनी भिलवडी, किर्लोस्करवाडी व ताकारी या रेल्वे स्टेशन वर चौकशी करून या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक व तिकीट काढण्यासाठी चौकशी करावी असे आवाहन माजी खासदार श्री संजयकाका पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *