कुलगुरू डाॅ. एन. जे पवार प्रमुख पाहुणे
विटा – व्यक्तिमत्त्व विकास, गुणवत्ता वाढ आणि वैचारिक क्षमता वृद्धीसाठी पुस्तक वाचन आवश्यक आहे. गेले वर्षभर अमृतवेल समुहाच्या माध्यमातून ‘पुस्तक वाचन व आकलन स्पर्धा’ राबविण्यात आली. या स्पर्धेच्या शुभारंभ आदर्श महाविद्यालय येथे शनिवारी दि. 9 मार्च रोजी होणार आहे.
अमृतवेल फाऊंडेशन, अमृतवेल मीडिया समूह, अमृतवेल ग्रामविकास प्रबोधिनी, श्रीमती शहाबाई यादव साहित्य विकास मंच आणि लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श महाविद्यालय यांच्या वतिने या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. एन. जे. पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार सदाशिवरावभाऊ पाटील अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष वैभवदादा पाटील, वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक रविंद्र चव्हाण, प्रा. संजय ठिगळे प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती स्पर्धेचे संयोजक आणि अमृतवेल समुहाचे अध्यक्ष धर्मेंद्र पवार यांनी दिली.
स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन!
‘अमृतवेल पुस्तक वाचन व आकलन स्पर्धा, ही राज्यभरासाठी खुली करण्यात आली असून पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. प्रत्येक स्पर्धकाने आवडीची आणि उपलब्ध होतील ती दहा पुस्तके वाचून त्याचा सारांश वहीत लिहून अमृतवेलकडे जमा करणे आवश्यक आहे. यामध्ये किमान पुस्तक चरित्रात्मक असावीत. एप्रिल ते जुलै असा चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून शाळा – महाविद्यालयाच्या शिफारसपत्रासह वही जमा करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे.