महाराष्ट्राच्या कर्णधारपदी सांगलीची कु. वैष्णवी चाफे

: खेलो इंडिया महिला खो – खो लीगसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर

विटा (प्रतिनिधी) : राजस्थान येथे होणाऱ्या खेलो इंडिया महिला राष्ट्रीय खो खो लीग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची कर्णधार म्हणून सांगलीची वैष्णवी चाफे (भिकवडी बुद्रुक, ता. खानापूर) व धाराशिवची अश्विनी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. ८ ते १० मार्च या कालावधीत जयपुर, राजस्थान येथे खेलो इंडिया महिला राष्ट्रीय खोखो लीग (१४ किशोरी व १८ वर्षाखालील मुली) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्रासह, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली, पंजाब , हरियाणा, प. बंगाल, ओडिशा, मणिपूर हे संघ दोनही गटात तर कोल्हापूर व हिमाचल प्रदेश (किशोरी गटात) आणि छत्तीसगड व आसाम (मुली गटात) असे १२-१२ संघ सहभागी होत आहेत.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा यांनी जाहीर केले. या संघास महाराष्ट्र खोखो संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, महाराष्ट्र संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. अरुण देशमुख, सहसचिव डॉक्टर प्रशांत इनामदार, प्रशांत पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

खानापूर तालुक्यात जल्लोष : महाराष्ट्र किशोरी खो – खो संघाची कर्णधार म्हणून निवड झालेली कु. वैष्णवी चाफे ही भिकवडी बुद्रुक या गावातील राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रीडा मंडळाची खेळाडू आहे. वैष्णवी सध्या आदर्श माध्यमिक विद्यामंदिर भिकवडी बुद्रुक या शाळेत शिक्षण घेते. वैष्णवीला प्रशिक्षक समीर माने, दत्ता पाटील, विकास तामखडे आणि प्रियांका शरणाथे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. महाराष्ट्र संघाच्या कर्णधार पदी निवड झाल्याबद्दल वैष्णवी चाफे हिच्यावर खानापूर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

किशोरी संघ : मैथिली पवार, सिद्धी भोसले, मुग्धा वीर र, राही पाटील (सर्व धाराशिव), वेदिका तामखडे, वैष्णवी चाफे (कर्णधार), श्रावणी तामखडे, पायल तामखडे (सर्व सांगली), काल्याणी लामकाने, अनुष्का पचार (सर्व सोलापूर), धनश्री लव्हाळे, अपर्णा वर्दे (सर्व पुणे) गौरी जाधव (सातारा), शीतल गांगुर्डे (नाशिक), आकांक्षा क्षीरसागर (छ. संभाजीनगर), प्रशिक्षक महेंद्रकुमार गाढवे, व्यवस्थापिका नंदिनी धुमाळ,

मुलीचा संघ : अश्विनी शिंदे (कर्णधार), सुहानी धोत्रे, प्रणाली काळे, सृष्टी सुतार (सर्व धाराशिव), प्रतीक्षा बिराजदार, नयन काळे, धनश्री तामखडे (सर्व सांगली), दीपाली राठोड, पूर्वा वाघ (सर्व पुणे), सादिया मुल्ला, स्नेहल लामकाने (सर्व सोलापूर), आर्या डोरलेकर (रत्नागिरी), साक्षी पार्सेकर (मु. उपनगर), संस्कृती पाटील (ठाणे), काजळ मोरे (मुंबई), प्रशिक्षक विकास परदेशी, व्यवस्थापिका श्वेता गवळी.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *