रेवनगाव : सुहास बाबर यांचे हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बाबासाहेब मुळीक, सुहास शिंदे, राजाभाऊ शिंदे उपस्थित होते.
: युवा नेते सुहास बाबर यांची ग्वाही
: रेवणगाव,कुर्ली,गोरेवाडीत विकासकामांचे उद्घाटन
विटा ( प्रतिनिधी) : स्वर्गीय आ. अनिलभाऊ यांनी शासन स्तरावरील ज्या योजना प्रभावीपणे मतदारसंघात राबवल्या त्या सर्व योजना इथून पुढील काळातही अगदी काटेकोरपणे राबवून अनिलभाऊंची स्वप्नपूर्ती करू, अशी ग्वाही सुहास बाबर यांनी दिली. ते रेवणगाव , कुर्ली, गोरेवाडी येथील विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
बाबर म्हणाले, गेल्या 10 वर्षात टेंभू च्या व्यतिरिक्त जिल्ह्यात सर्वात जास्त निधी आमदार अनिलभाऊ यांनी मतदारसंघात आणला. मतदारसंघाचा नियोजनबद्द विकास करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. त्याच विकासाचा धागा पकडून मी मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला आश्वासित करतो की इथून पुढील काळातही मतदारसंघ विकासाच्या बाबतीत मागे राहणार नाही. तुम्हा लोकांच्या विकासाच्या बाबतीतील ज्या अपेक्षा भाऊंच्या कडून होत्या त्या सर्व पूर्ण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. याबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,ना. शंभूराजे देसाई , ना. उदय सामंत या सर्वांचे मतदारसंघावर बारकाईने लक्ष आहे व ते आपल्या मतदारसंघातील विकासाच्या प्रत्येक मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत आहेत त्यामुळे निश्चितच भाऊंच्या स्वप्नातील मतदारसंघ आपण साकारू, अशी ग्वाही सुहास बाबर यांनी दिली.
यावेळी खानापूर घाटमाथ्याचे नेते, राजाभाऊ शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, बाबासाहेब मुळीक, खरेदी विक्री संघाचे व्हा चेअरमन सदाशिव हसबे, प्रकाश बागल, मार्केट कमिटीचे माजी सभापती राजेश कदम, दिनकर गायकवाड, सज्जन बाबर, लाला बापू पाटील,पांडुरंग डोंगरे, महेश जाधव, बापूराव शिंदे, श्रीकांत जाधव, ओंकार पाटील उपस्थित होते.