पश्चिम महाराष्ट्र खाटीक समाज मेळावा संपन्न
वाळवा ( प्रतिनिधी ) : शिक्षण, समाज व्यवस्था, आर्थिक विकास घडवण्यासाठी समाज हा विकासाच्या मुख्य प्रवाहात यायला पाहिजे. यासाठी पश्चिम महाराष्ट्र खाटीक समाज मार्गदर्शन व चर्चासत्र मेळावा इस्लामपूर ता.वाळवा येथे पार पडला यावेळी मुस्लिम खाटीक समाज हा सद्य स्थितीला शैक्षणिक, आर्थिक व शासकीय अनेक गोष्टी मध्ये अजून पुढे गेला पाहिजे, असे मत बशीर कुरेशी (मुंबई) यांनी मांडले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुदस्सर चौधरी म्हणाले, खाटीक समाजातील मुलांनी शैक्षणिक दृष्ट्या सक्षम व्हायला पाहिजे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून नोकरीची संधी निर्माण केली पाहिजे. आज जातप्रमाणपत्र मिळवताना समाजातील लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे यासाठी शासन दरबारी दाद मागावी लागेल.
आज समाजातील महिला, वयस्क लोक, गरीब होतकरू मुलांना शासनाकडून मदतीचा हात पुढे केला जातो त्याची माहिती प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचवण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे.
मेळाव्यात आयोजकांनी संपूर्ण शासकीय योजना व त्यांची माहिती उपस्थित लोकांना दिली. त्यासाठी लागणारे कागदपत्र कोणते ते कसे मिळवायचे याची माहिती दिली गेली.
या मेळाव्यासाठी नसरुद्दीन कुरेशी अॕड. मेहबूब कोथिंबीर मुस्ताक बिजापूरे तसेच सांगली, मुंबई, नवी मुंबई, ऐरोली, खारघर, मुंब्रा, पनवेल,सातारा, कराड, रहिमतपूर, कुंडल,जयसिंगपूर, तासगाव, आष्टा,कसबे डिग्रज, सांगली,मिरज, सांगोला, विटा, रत्नागिरी, मंगळवेढा, पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर,वडगाव इत्यादी ठिकाणहून समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी अध्यक्ष शकिल खाटीक, उपाध्यक्ष हैदर खाटीक, सचिव इब्राहिम खाटीक, खजिनदार मुस्ताक खाटीक, सहसचिव ताहेर खाटीक, सहसचिव शफी खाटीक, रज्जाक खाटीक,अबू कलम खाटीक, अजिज खाटीक, दिलावर खाटीक, शकिल खाटीक, वशीम खाटीक, सिकंदर खाटीक, हुसेन खाटीक, जमीर खाटीक, खाटीक युवा मंच सर्व अध्यक्ष व उपाध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.