महाविकास आघाडी की महायुती ? सुहास भैय्या म्हणतायेत, मी तर..


विटा (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी महायुतीचा उमेदवार म्हणून आपणासमोर येत असलो तरी मलाही सर्व स्तरातून पक्ष, गट-तट विसरून लोक पाठबळ देत आहेत. लोकांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मी जनतेचा उमेदवार असल्याचे तीव्रतेने जाणवत आहे, असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले.

बोरगाव : येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करताना सुहास बाबर. यावेळी प्रतापनाना पाटील, नवनाथ पाटील,  संभाजी पाटील, अरुण खरमाटे उपस्थित होते.

बोरगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. यावेळी सुहास बाबर बोलत होते. महादेव मळा ते बोरगाव, बोरगाव ते पंचक्रोशी हायस्कूल, बोरगाव ते नवे बोरगाव व बोरगाव ते आळते रस्ता करणे या कामांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य निवास पाटील,  सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ. प्रतापनाना पाटील,  नवनाथ पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पाटील, संदीप पाटील, अरुण खरमाटे, धनाजी पाटील, पोपट पाटील, सागर पाटील, चंदू नाना पाटील, किरण पाटील  उपस्थित होते.

बाबर म्हणाले, स्वर्गीय आमदार अनिल भाऊंना विसापूर सर्कल या परिसराने सलग दोन निवडणुकीत मोलाची साथ दिली. आमदार भाऊंनी देखील विसापूर सर्कलमधील गावोगावी आणि वाड्यावस्त्यांचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आमचे आणि विसापूर सर्कलचे  जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहे आहेत. हे संबंध अतूट ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विसापूर सर्कलच्या विकासाच्या माझ्याही काही संकल्पना आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय भाऊंच्या प्रमाणेच हा परिसर मलाही साथ देईल याची पूर्ण खात्री व विश्वास आहे. विसापूर सर्कलच्या विकासाच्या सर्व संकल्पना पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी त्यांच्या राजकीय जीवनात त्यांचेकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. राजकीय पक्ष, गट तट विसरून अनिलभाऊंनी येणाऱ्या व्यक्तीचे काम कसे होईल, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली.  तुम्ही जे प्रेम मला आज स्वर्गीय भाऊंच्या पश्चात देत आहात त्यामुळे मी भारावून जात आहे. राजकारणात पावलोपावली ही कृतज्ञता ठेवून मी वाटचाल करीन असेही बाबर यांनी यावेळी सांगीतले.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *