विटा (प्रतिनिधी) : टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याची वर्क ऑर्डर निघाल्यानंतर विटा – रेवानगर (सुळेवाडी) येथील ग्रामस्थांच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास बाबर व जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर या दोन्ही बाबर बंधूंचा कृतज्ञतापूर्वक आज सत्कार करण्यात आला.
टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्यामध्ये विटा परिसरातील रेवानगर भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला फायदा होणार आहे. विटा शहराच्या अनेक ठिकाणी या सहाव्या टप्प्यामुळे शेतीला पाणी जाणार आहे. त्यामुळे विटा शहराचा कायापालट होणार आहे. स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी सहाव्या टप्प्याचे काम अत्यंत तळमळीने पूर्ण केले पण आज ते आपल्यात हयात नसले तरी त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन्ही मुलांनी यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा घेऊन मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आणि सहाव्या टप्प्याची वर्कर ऑर्डर प्राप्त झाली. यासाठी रेवानगर परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने आज त्यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आले
यावेळी सिद्राम शेठ बुचडे, तेजपाल बुचडे सर, उत्तम पवार , अतुल पवार ,भागवत सावंत सर, नारायण पवार ,प्रकाश पवार, संभाजी बुचडे, संभाजी बुधावले, सुभाष पवार, बाबुराव पवार, सुरेश बुचडे ,संतोष मंडले, सुमित पवार ,भारत पवार, संजय सुळे, अनिल अवताडे,सदाशिव गायकवाड, धोंडीराम बुचडे, शिवाजी सुळे, इंद्रजीत सुतार, मच्छिंद्र सुळे आदी उपस्थित होते.