कडेगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल वाजले असून महायुती व महाविकास आघाडी यांच्यात दोन्हीही सत्ता मिळविण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहेत .यापैकी कडेगाव पलुस मतदार संघात महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम उमेदवार आहेत. त्यांना या वेळच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी संग्राम देशमुख यांचे तगडे विरोधक म्हणून आव्हान निर्माण झाले आहे. नव्हे तर त्यांना या निवडणुकीत धोका पोहचू शकतो . कारण भाजपाकडून संग्राम देशमुख यांना अजून पर्यंत नाव जाहिर नसले तरी त्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे देशमुखांची उमेदवारी हि विश्वजीत कदमांना डोकेदुखी ठरू शकणार आहे .
स्व. डॉ पतंगराव कदम यांनी शेती तसेच शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे. विकासकामांचा अक्षरश डोंगर उभा केल्यामुळे सर्वसामान्य मानसाशी त्यांची नाळ जोडली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे सुपुत्र डॉ .विश्वजीत कदम हिरिरीने काम करत आहेत. महापूर असो कोरोनाचा काळ असो यामध्ये त्यांनी मोलाचे समाजकार्य केले आहे. त्यामुळे त्यांचा विजयी नक्की मानला जात आहे .
टेंभू योजनेचे शिल्पकार म्हणून ज्यांचे आदराने नाव घेतले जाते ते म्हणजे स्वर्गीय संपतराव देशमुख. संपतराव देशमुख यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत सर्वसामान्य जनतेला मिळवून दिलेला न्याय तसेच टेंभूच्या पाण्यासाठी केलेली धडपड अहोरात्र घेतलेले कष्ट हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे. एवढेच नव्हे तर जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नेता म्हणून स्वर्गीय अण्णांची ओळख . यांचेच सुपुत्र सांगली जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जिल्ह्यातील प्रत्येक गाव वाडीवर तसेच तळागाळात पोहोचून विकास कामांची पाळेमुळे रोवली आहेत. एवढेच नव्हे तर आमदार खासदार यांना जी कामे करता आली नाहीत ती कोट्यावधींची विकासकामे संग्राम देशमुख यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना केलेली आहेत. हि विकासकामे करत असताना कोणत्याही प्रकारचे राजकारण व पक्षपातीपणा देशमुख यांनी केलेला नाही. कोणतेही विकास काम करत असताना देशमुख यांनी त्या त्या ठिकाणच्या सर्वसामान्य जनतेला व कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन त्या कामाची आखणी करणे काम मंजूर करून आणने व ते काम पूर्णत्वास नेणे .व पूर्णत्वास नेलेले काम हे टिकाऊ ,योग्य व दर्जेदार करणे ते काम करत असताना कोणत्याही प्रकारची तडजोज न करणे हा संग्राम भाऊंचा स्वभाव तसेच मंजूर झालेल्या कामाचे भूमिपूजन असो अथवा पूर्ण झालेल्या कामाचे उद्घाटन असो कधीही त्यांनी स्वतः एकट्याने नारळ फोडला नाही. उपस्थित असणाऱ्या मधून एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता बोलवायचा व त्याला नारळ फोडायचा मान द्यायचा हा भाऊंच्या मनाचा मोठेपणा. त्यामुळे देशमुख यांचे स्थान सर्वसामान्य जनतेच्या मनात घर करून राहिले आहे. त्यामुळे विश्वजीत कदम आणि संग्राम सिंह देशमुख यांच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून संग्रामसिंह देशमुख इतिहास घडवणार का ?