कडेगाव ( प्रतिनिधी ) : संपतराव देशमुख को-ऑप. मिल्क युनियन लिमिटेड कडेपूर, (डोंगराई दूध) या संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दीपावली निमित्त रिबेट व बोनस देण्याची घोषणा दूध संघाचे चेअरमन मा. श्री. राजकुमार निकम यांनी केली आहे. त्यामध्ये प्राथमिक दूध संस्था, व सेंटर यांना म्हैस दुधासाठी प्रति लिटर 2 रुपये व गाय दुधासाठी प्रति लिटर 1 रुपये 50 पैसे असा रिबेट व बोनस जाहीर केला आहे. त्याची एकूण रक्कम 2.51 कोटी येत्या दोन दिवसात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहेत. दूध संघातील कर्मचाऱ्यांनाही दिपावली निमित्त 8.33% बोनस आणि सर्व कर्मचाऱ्यांना मोफत श्रीखंड ही वाटप करण्यात येणार आहे.
चेअरमन राजकुमार निकम म्हणाले,
दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून नेहमीच जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळवून देणे हे ध्येय ठेवून जास्तीत जास्त बोनसची रक्कम ही देण्याचा प्रयत्न केला आहे. दूध संघाचे सध्याचे संकलन हे 65 हजार लिटर असून त्यामध्ये वाढ करून ते एक लाख लिटर पर्यन्त वाढवण्याचा मानस आहे. तसेच दुग्ध पदार्थांनाही चांगली मागणी असून त्याचीही ग्राहकांना चांगली सेवा व गुणवत्तापूर्ण पदार्थ देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असल्याचे चेअरमन राजकुमार निकम यांनी सांगितले. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाचे काम आदर्शवत सुरू आहे. आगामी काळात दूध संघ महाराष्ट्रात सर्वात अग्रेसर राहील यासाठी काम करू अशी ग्वाही चेअरमन निकम यांनी दिली आहे.
यावेळी दूध संघाचे व्हा. चेअरमन श्री. चंद्रकांत पाटील, संचालक श्री. तानाजी जाधव, श्री. संतोष माने, श्री. खाशाबा कदम, श्री. जयवंत मगर पाटील, श्री. संजय पवार, श्री. विश्वास महाडिक, श्री. बाळासाहेब वत्रे, श्री.भानुदास शिंदे, दूध संघाच्या संचालिका सौ. अपर्णाताई देशमुख (वहिनीसाहेब), सौ. मंदाताई करांडे, श्री. जगन्नाथ माळवे, दूध संघाचे कार्यकारी संचालक श्री. प्रकाश मानकर यांचे सह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.