विट्यात आज ‘ AI ची जादु ‘ यावर अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान |

विटा (प्रतिनिधी) : येथील जय मल्टीपर्पज हॅाल, मायणी रोड विटा येथे आज मंगळवार १९ रोजी ‘ AI ची
जादु ‘ (कृत्रिम बुद्धिमत्ता) याविषयावर संगणक तज्ञ अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान सायंकाळी ५ वाजता आयोजित केले आहे, अशी माहिती रोटरी चे अध्यक्ष सचिन आबदर यांनी दिली आहे.

आबदर म्हणाले, संगणक व मोबाईल युगाच्या क्रांतीनंतर आता तंत्रज्ञानाचा अत्युच्च अविष्कार वाटावा अशा AI (आर्टिफिशीयल इंटिलीजन्स) अर्थात कृत्रीम बुद्धीमतेच्या अभुतपुर्व तंत्रज्ञानाने संगणकीय तंत्रज्ञानाचे संदर्भच बदलुन टाकले आहेत. हे तंत्रज्ञान अनेक अशक्य व वेळखाऊ गोष्टी चुटकीसरशी करुन दाखवत आहे. हे तंत्रज्ञान  दैनंदीन मानवी जिवन सुकर करण्यासाठी वरदान ठरत असताना याचा गैरवापरही तितकाच गंभीर ठरत आहे. दुसऱ्या बाजुला या तंत्रामुळे उद्योग,व्यापार, शेती,तंत्रज्ञानामधील अनेक दैनंदीनकामे कमालीची सुकर व अतिशय कमी मनुष्यबळ वापरुन करता येतील असे तंत्र अवगत होत आहे. या तंत्रज्ञानामुळे या पुढे  अनेक नोकऱ्या हिरावुन घेतल्या जातील असे भाकीत काही तज्ञ करीत असताना यामुळे भविष्यात काही जॅाब कमी होतील. पण त्याहीपेक्षा वेगळ्या प्रकारच्या नविन संधी प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. मात्र त्यासाठी तरुणांनी स्वतःला सतत अपडेट करावे लागेल, असाही मतप्रवाह मांडला जात आहे.

या पार्श्वभुमीवर  या तंत्रज्ञानामुळे दैंनदिन मानवी जिवनावर झालेल्या व येऊ घातलेल्या परीणामांचे अत्यंत अचुक विश्लेषन करण्यासाठी विटा रोटरीने संगणक व AI तंत्रज्ञान तज्ञ तसेच उद्योगक्षेत्र, कार्पोरेटजगत, संगीतक्षेत्र, संगणक तंत्रज्ञान, मानसशास्त्र, गणीत यासारख्या विषयांवर तब्बल ७५ लोकप्रिय पुस्तके लिहिलेल्या अच्युत गोडबोले सरांना व्याख्यानासाठी विट्यात निमंत्रित आहे. त्यांचे हे व्याख्यान समस्त विटेकरांसांठी विनाशुल्क आयोजित केले असुन हे व्याख्यान मंगळवार दिनांक १९ ॲागस्ट २०२५ रोजी ठिक ५.०० वाजता जय मल्टीपर्पज हॅाल, मायणी रोड याठिकाणी आयोजित केले  आहे. संगणक व मोबाईल साक्षर असलेल्या प्रत्येकाने या व्याख्यानाचा  आवर्जुन लाभ घ्यावा, असे आवाहन विटा रोटरी परीवाराच्या वतीने अध्यक्ष सचिन आब्दर आणि किरण तारळेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *