विट्यात तरुणाचा निर्घृण खून; आरोपी फरार

0
file_00000000261c82078d324b8152d27be6
Spread the love

विटा (प्रतिनिधी): विटा शहरातील मायाक्कानगर परिसरात बांधकामावर काम करणाऱ्या २८ वर्षीय मजुराचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी (२९ जुलै) दुपारी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजमन राजाराम कुम्हार (वय २८, रा. धामोरा, सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) हा मायाक्कानगर येथील बांधकामावर मजुरीचे काम करत होता. आरोपी अशोक कुम्हार (रा. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) याच्याशी किरकोळ कारणावरून वारंवार वाद होत होता. त्याच रागातून नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील बेडरूममध्ये झोपलेल्या राजमनच्या डोक्यावर आरोपीने लाकडी दांडक्याने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात राजमनचा मृत्यू झाला.


याप्रकरणी दयानंद पांडुरंग साबळे यांच्या फिर्यादीवरून विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कणसे करीत असून, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *