आष्टा: (डॉ तानाजी टकले ) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शन खाली दूधगाव, कवठेपिरान, कसबे डिग्रज, तुंग, शिगाव, गाताडवाडी, ताकारी या गावाना पुरामुळे पाणी पुरवठा बंद असल्याने एक हात मदतीचा म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे या गावातील ग्रामस्थांनी आ. जयंतराव पाटील व कारखान्यांचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांचे आभार मानले आहे.
वारणा व कृष्णा नदी काठच्या गावांना पुर आल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. कारखान्यांचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी या गावांना पिण्याच्या पाणी व्यवस्थे संधर्भात कार्येकर्त्यांना सूचना केल्या. त्यानुसार आष्टा येथून पाच हजार लिटर क्षमतेचे सात टँकरद्वारे पाच दिवस पाणीपुरवठा सुरु आहे. सुमारे दोन लाख लिटर पाणी टँकर भरुन वितरित झाले आहे. पूरग्रस्त नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा दिलासा मिळत आहे.
आष्टा येथील युवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे तालुका अध्यक्ष संग्राम जाधव, माजी कार्यसम्राट नगरसेवक अर्जुन माने, कारखान्यांचे माजी संचालक माणिक शेळके,युवा नेते अमित ढोले, चैतन्य ढोले (सावकर )माजी नगरसेवक दिपक मेथे, युवकचे माजी अध्यक्ष अनिल पाटील, किरण पाटील, अथर्व माने, चिनू माने,यांनी दुधगाव, कवठेपिरान, कसबे डिग्रज, तुंग, शिगाव, या गावांमध्ये पाणीपुरवठा करून नागरिकांचा पिण्याच्या पाणी प्रश्न मिटवला आहे.