चिंचणीत डाक चौपाल उपक्रम; डाक विभागाने दिली योजनाची माहिती


कडेगाव (प्रतिनिधी) : चिंचणी ता. कडेगाव  येथे डाक विभागाच्यावतीने डाक चौपाल अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला पोस्टाच्या माध्यमातून जास्तीत जास्त बँकिंग सुविधा  मिळाव्यात, तसेच जनतेला आर्थिक लाभाच्या विविध योजनांचा  थेट फायदा मिळावा यासाठी   एकदिवसीय डाक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाचे उद्‌घाटन चिंचणीचे  सरपंच डॉ रमेश मदने यांच्या हस्ते झाले. यावेळी  सर्व ग्रामपंचायत सदस्य  तसेच विटा डाकविभागाचे  निरीक्षक  सौरभ खिस्ते, प्रशांत कुंभार, दत्ता पाटील, नामदेव पोमधरण, अधिकराव  महाडिक आदी उपस्थितीत होते.

दिवसभर चाललेल्या उपक्र‌मात पोस्ट ऑफिस, सेव्हींग बँक , आर्वती ठेव, सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान बचत खाते, माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाग‌णारे खाते यासह   पोस्टाच्या अनेक  योजनांची माहिती देण्यात आली.याशिवाय विविध योजनांसाठी  नोदणी करण्यात आली. जवळपास चारशे लोकांनी उपक्रमाला भेट देऊन लाभ घेतला.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *