विटा ( प्रतिनिधी ) : स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी समर्पित भावनेने आयुष्यभर कार्यकर्त्यांना व मतदारांना प्रमाण मानून काम केले. त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही कार्यरत आहोत. त्यामुळे आमचे आणि कार्यकर्त्यांचे विश्वासाचे एक अतूट नाते बनले आहे. अनिलभाऊंनी हा जो प्रामाणिक कार्यकर्त्यांचा ठेवा आम्हाला दिला आहे तो जीवात जीव असेपर्यंत जपण्याचे काम आम्ही करणार आहोत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष युवक नेते सुहास बाबर यांनी केले.
घाडगेवाडी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पार पडले. यावेळी संपूर्ण घाडगेवाडी गावाने विधानसभेसाठी एकमुखी सुहास बाबर यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विरोधी पाटील गटातून स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर गटात, शिवसेना पक्षात घाडगेवाडीतील असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल दादा बाबर यांच्या हस्ते या सर्व नूतन कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला
घाडगेवाडी येथील जेष्ठ मंडळी तुकाराम घाडगे, अंकुश घाडगे , नारायण पिसाळ, किरण दाजी पाटील, दत्तात्रय घाडगे,धनाजी कोकाटे, नवनाथ घाडगे, संजय पवार, सुनील घाडगे, प्रल्हाद घाडगे, पोपट घाडगे, यशवंत घाडगे,दिनकर घाडगे, विठ्ठल घाडगे, भानुदास घाडगे, विजय महाजन, बाबासो जाधव आदी मान्यवरांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच संदीप कोकाटे, शिवलिंग कोकाटे, भरत घाडगे, अमोल घाडगे, पांडुरंग घाडगे, शंकर घाडगे, रमेश घाडगे, आनंद घाडगे, सुनील मोहिते, अनिल घाडगे, सत्यवान घाडगे, गणेश घाडगे, प्रताप घाडगे,अनिल घाडगे,विकास घाडगे, दत्ता घाडगे, केदारनाथ घाडगे या गलाई बांधवांनीही यापुढील काळात बाबर कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्यास सांगितले.
पुढे बोलताना बाबर म्हणाले, टेंभूचा सहावा टप्पा व्हावा यासाठी अनिलभाऊंनी त्यांचे आयुष्य खर्ची घातले. आज घाडगेवाडी सारख्या गावाला सहाव्या टप्प्याचे पाणी जात असताना या गावाने जो आम्हाला एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह आहे. ही एक प्रकारे स्वर्गीय अनिल भाऊंना आदरांजली असून या कार्यकर्त्यांना नेहमी सन्मानाची वागणूक दिली जाईल. गाव छोटे का मोठे यापेक्षा त्या गावाचा सर्वांगीण विकास करण्याची आमची जबाबदारी आहे, ती आम्ही निश्चित पूर्ण करू असे आश्वासनही सुहास बाबर यांनी यावेळी दिले.