ज्या व्यक्तिमत्वाने माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यास कोणताही राजकीय संदर्भ नसतांना अवघ्या तालुकाभर नावलौकीक मिळवून दिला. राजकीय क्षेत्रात एक वेगळी ओळख, प्रतिष्ठा तथा मान-सन्मान मिळवून दिला असे आमचे बंधुतुल्य, मोठ्या भावासमान, सांगली जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष युवानायक सन्माननीय सुहास (भैय्या) अनिलभाऊ बाबर यांचा आज वाढदिवस, त्याबद्दल चार शब्द…!
राजकारण जेव्हापासून समजु लागले, तेव्हापासून एका नावाबद्दल दिवसेंदिवस आकर्षण वाढत गेले, ते म्हणजे आमचे लाडके भैय्यासाहेब… भैय्या बद्दल लिहिल तेवढे कमीच आहे. अत्यंत कमी वेळात, अल्पावधीतच भैय्यांनी आपल्या कर्तुत्वाची छाप पाडत, लहानापासून-थोरांपर्यंत जिल्हाभर सर्वांची मने जिंकली आहेत. शांत, संयमी आणि तेवढाच प्रेमळ स्वभाव हे मला भावलेले भैय्याचे व्यक्तिमत्व ! 2010 साली एका कामानिमित्त भैय्यांकडे गेलो होतो. ती भैय्यांची आणि माझी पहिलीच भेट होती. तिथे गेल्यावर भैय्यांनी माझी आपुलकीने विचारपूस केली कुठून आलाय ? काय नाव तुमचं ? काय काम आहे का माझ्याकडे ? असं विचारल्यावर मी माझं काम सांगितल आणि अवघ्या 5 मिनिटात ते माझं काम झालं. त्यावेळी मी खुश होऊन आनंदाने हातात दिला व भैय्यांना मिठी मारली. 2010 साली मारलेली मिठी आजही तशीच घट्ट आहे. त्यावेळी मला भैय्यांनी सांगितल दत्ता… तुम्हाला कोणतीही अडचण येऊ द्या, हा सुहास बाबर तुमच्या पाठीमागे मित्र, तुमचा मोठा भाऊ म्हणून नेहमीचं तुमच्या सोबत असेल. आणि आज अखेरपर्यंत भैय्यांनी तो शब्द तसाच पाळला आहे. भैय्यां नेहमीचं माझ्या सुख दुःखात मोठया भावाप्रमाणे आजही माझ्या सोबत आहेत. आज आमच्या मैत्रीला 14 वर्षे झाली तसा मी भैय्यांपेक्षा वयाने खूप लहान आहे. पण त्यांनी कधी त्याची जाणीवही होऊन दिली नाही.
आजपर्यंत भैय्यानी ज्या पदांवर काम केले, त्या सर्व पदांना एक वेगळीच प्रतिष्ठा निर्माण झाली. कारण त्याला जोड होती त्यांच्या कर्तुत्वाची..! २०१२ ची गोष्ट आठवतेय, पंचायत समिती ची निवडणुक होती.. भैय्यानी अर्ज भरला होता.. त्यांचा राजकारणातील हा प्रारंभ होत असताना त्यावेळी मात्र त्यांच्या घरात कोणतेही राजकीय पद न्हवते. हा काळ त्यांच्यासाठी कसोटीचा आणि संघर्षाचा काळ होता. अशी सर्व परिस्थिती असताना भैय्यानी ऐतिहासिक विजय मिळविला आणि सगळ्यांच्या भुवया तेव्हाच उंचावल्या होत्या..!
आजकाल बरेच राजकारणी आलिशान व्यवस्थेमधे वावरताना दिसतात, पण भैय्या तसे नाही.. चहाच्या टपरीवर कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करत चहाचा आस्वाद घेणारे भैय्या, बऱ्याच कार्यक्रमात प्रेक्षकांत बसणारे भैय्या, सर्वसामान्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्यासमवेत सार्वजनिक ठिकाणी स्नेहभोजन करणारे भैय्या मला आजही भावतात..! राजकारण कमी आणि समाजकारणाची जास्त आवड असणारे भैय्या त्यांच्या भावनिक स्वभावाचे तथा त्यांच्या दात्रुत्वाचे अनेक किस्से आहेत. कोविडचा काळ चालू होता त्यामध्ये सख्खा भाऊ सख्या भावाला मदत करत नव्हता. लोकांची खूप बिकट परिस्थिती चालू होती. बेड मिळत नव्हते ऑक्सीजन मिळत नव्हते. अश्यातच आमच्या भिकवडी बु. गावातील एका व्यक्तीला अचानक त्रास होऊ लागला.त्याची ऑक्सीजन लेव्हल कमी होऊ लागली त्याला बेड मिळत न्हवता.त्या व्यक्तीच्या घरातून मला कॉल आला की भैय्यांना फोन कर की आम्हाला बेड मिळत नाही.आम्हाला बेडची खूप गरज आहे. ती वेळ होती रात्री 1.30 ची मी भैय्यांना कॉल केला तिसऱ्या रिंग मध्ये कॉल उचलला आणि भैय्यांना असं असं झालंय म्हणून सांगितलं मला म्हणले दत्ता 5 मिनिट द्या कुठे बेड शिल्लक आहे बघतो आणि लगेच सांगतो. 5 मिनिटाच्या आत कॉल माघारी आला ITI कॉलेजवर बेड शिल्लक आहे लगेच जावा तिथे आणि माझ्याकडून त्या व्यक्तीचा नंबर घेऊन त्यांना पण कॉल केला. बेडची व्यवस्था केलीय तिथे जावा काय अडचण आली तर परत कॉल करा. सांगण्याच्या उद्देश एवढाच भैय्यांनी कधी पार्टी, पक्ष हा कोणत्या पार्टीचा तो कोणत्या पार्टीचा असं कधीही न बघता काम केलं.
अजुन एक किस्सा आवर्जून सांगावा असा वाटतो. आमच्या भिकवडी बु. गावातील एका 8 वर्षाच्या मुलाचा सर्पदंश झाला. तो मुलगा अवघ्या 10 मी बेशुद्ध पडला.त्याला तातडीने विट्याला घेऊन गेले. त्यावेळी त्याच्या घरातील लोक भीतीने कापत होते. त्या मुलाचे आजोबा त्यावेळी रहिमतपूरमध्ये होते. त्यावेळी त्यांनी भैय्यांना कॉल केला. भीतीने रडत भैय्यांना असं असं झालंय म्हणून सांगितलं. त्यावेळी भैय्यांनी त्यांना सांगितल तुम्ही अजिबात भिऊ नका, मी बघतो सगळं त्याच आणि फोन ठेवला. लगेच डॉक्टरांना कॉल करून चर्चा केली. डॉक्टरांनी त्याला अर्जंट कार्डीओ अँब्युलन्स मधून सांगलीला घेऊन जायला सांगितलं. भैय्यांनी लगेच भिवघाट मधून ती गाडी बोलावून घेतली आणि मला कॉल केला दत्ता तुम्ही लगेच विट्याला या असं असं सांगलीला जायचं आहे. पुढे सांगलीत सुद्धा भैय्यांनी कॉल करून सांगितल होत. तिथेही लगेच डॉक्टरांनी ट्रिटमेंट चालू केली. रात्रीच्या 2 वाजता भैय्यांनी त्या बाळाच्या घरी फोन करून सांगितलं निवांत झोपा काही अडचण नाही. भैय्यांनी परत सकाळी 7 वाजता कॉल करून सांगितल आता व्यवस्थित आहे काळजी करू नका आणि तो मुलगा पूर्णपणे बरा झाला. परत भैय्यांनी तो घरी आल्यावर भिकवडी मध्ये येऊन त्याची भेट घेऊन काहीही अडचण आली तर मला कधीही कॉल करा अस भैय्यांनी त्यांना सांगितल.
सांगण्याच तात्पर्य एवढंच सामान्य माणसाला कसलीही अडचण आली तर त्या माणसाच्या पाठीमागे सुहास भैय्या पूर्णवेळ उभा राहून त्याला आधार देतात व त्याला त्या अडचणीतून बाहेर काढतात. मी स्वतःला खूप नशीबवान समजतो सुहास भैय्यांच्या मित्र,भाऊ, कार्यकर्ता आहे.
भैय्यासाहेब तुमच्या रूपाने आम्हांला एक सर्वसमावेशक, सर्वसामान्य विचारांचा, सांगलीच्या इतिहासातील एक आदर्श उपाध्यक्ष मिळाला. आता भैय्या, अंतकरणी एकच इच्छा दाटून येते की, किंबहुना आम्ही तुमच्यात दडलेल्या एका ” आमदाराची” वाट बघतोय आणि तेही लवकरच साध्य होईल..! आणि ते साध्य होण्यासाठी भविष्यात वाट्टेल ते करु पण तुम्हांला एक दिवस “आमदार” करु हा शब्द तमाम युवा मनांच्या वतीने आपणांस देतो.. भैय्या आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…!
शेवटच्या श्वासापर्यंत,
अखंड तुमचाच,
दत्ता पाटील
अध्यक्ष – सुहासभैय्या बाबर युवा मंच भिकवडी बु.।!