विटा ( प्रतिनिधी ) : विसापूर सर्कलमधील सर्व गावांचा समतोल विकास करण्याचे काम स्वर्गीय आमदार अनिलभाऊंनी केले होते. तोच आदर्श समोर ठेवून भविष्यात या परिसरातील विकासासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. स्वर्गीय अनिल भाऊंना आपल्या परिसराने दहा वर्ष मोलाची साथ दिली दिली. त्याप्रमाणे मलाही आशीर्वाद द्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी यावेळी दिली.
खानापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांनी मतदारसंघाच्या आज विसापूर सर्कलमधील कचरेवाडी, मोराळे, नरसेवाडी,पेड, धोंडेवाडी,हातनूर, विजयनगर, गोटेवाडी, किंदरवाडी, मांजर्डे आदी गावांचा प्रचार दौरा केला. यावेळी विसापूर सर्कलमधील सर्व आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुहास बाबर पुढे म्हणाले, स्वर्गीय अनिल भाऊंनी ध्येयाने प्रेरित होऊन राजकारण केले. आपल्या मतदारसंघातील विसापुर सर्कल मधील लोकांनी अनिलभाऊंच्यावर व आमच्या कुटुंबावर अतोनात प्रेम केले. मला कोणाची तरी अडवायची आणि जिरवायची यासाठी राजकारण करायचे नाही. लोकप्रतिनिधी म्हणून भाऊंनी विसापुर सर्कलच्या विविध समस्यांचा, प्रश्नांचा जाणीवपुर्वक अभ्यास केला. त्यातूनच दुष्काळी मतदारसंघ हा कलंक पुसून आपल्या मतदारसंघातील शेतीला पाणी यावे, यासाठी सर्वप्रथम त्यांनी प्रयत्न सुरू केले. टेंभूचा सहावा टप्पा होत असताना विसापूर सर्कल मधील सर्व गावांना पाणी जाणार आहे. विकासाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी आपण सर्वांनी मला साथ द्या असे आवाहनही सुहास बाबर यांनी केले .