विट्यात आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे यांची हायटेक यंत्रणा

0
Spread the love

: पावसामुळे लेंगरे रोड वरील ब्लॉक झालेल्या गटाराची स्वच्छता करताना पालिकेची टीम. विटा, प्रतिनिधीविटा नगरपरिषदेच्या…

file_00000000f7c072098905fd03091ae0d9
Spread the love

: पावसामुळे लेंगरे रोड वरील ब्लॉक झालेल्या गटाराची स्वच्छता करताना पालिकेची टीम.

विटा, प्रतिनिधी
विटा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे व मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या मार्गदर्शन खाली शहर स्वच्छतेसाठी आरोग्य विभाग तत्परतेने कार्यरत आहे.
विटा शहरात वाढत्या पावसामुळे गटर ब्लॉक होत आहे या पार्श्वभूमीवर विटा नगरपरिषद आरोग्य विभाग ऍक्टिव्ह मोड वर कार्यान्वित आहे. यशवंतराव चव्हाण पुतळा ते लेंगरे रोड येथील व्यावसायिक व नागरिकांनी गटर ब्लॉक झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहे अशी माहिती आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे यांना दिली. नागरिकांच्या आरोग्याच्या या प्रश्नाचे निरसन करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन तात्काळ स्पॉट पाहणी करत संबंधित विभागाला काल स्वच्छतेच्या दिल्या कडक सूचना दिल्या.


त्यानुसार गटारावर असलेले व्यावसायिकांचे साहित्य त्वरित काढून घेण्यासंदर्भात पालिकेने सर्व व्यावसायिक व नागरिकांना नोटीस दिल्या. व पहाटे 5 वाजल्यापासून कामाला सुरुवात केली. जेसीबी, अग्निशामक गाडीच्या वॉटर प्रेशर,व इतर साधनसामुग्रीचा वापर करून गटर लाईन स्वच्छ केली आहे.

विटा नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष आरोग्य सभापती भालचंद्रभैय्या कांबळे व नगरपालिका प्रशासनाने केलेल्या या तत्पर कामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना आरोग्य सभापती
भालचंद्र कांबळे म्हणाले की, सध्या शहरात पावसाचे वाढते प्रमाण लक्षात घेताना आरोग्य विभागाने हायटेक यंत्रणा लावली आहे.पावसाळा सुरु होण्यापूर्वी ओढा, नाला रुंदीकरण स्वच्छता केले आहे, शहरात दररोज कचरा संकलन केले जात आहे. ब्लॉक होणाऱ्या गटारीची स्वच्छता, गवत काढणे, फवारणी करणे अश्या विविध प्रकारे स्वच्छतेचे कामकाज लक्षपूर्वक केले जात आहे. नागरिकांच्या स्वच्छतेच्या अडचणी समस्या निरसन करण्यासाठी आरोग्य विभागाचा आयईसी विभाग सक्षमपणे कार्यरत आहे. स्वच्छतेबाबत मिळणाऱ्या सर्व तक्रारी तत्परतेने सोडवल्या जातील. पावसाचा जोर वाढता आहे नागरिकांनी दक्षता घेऊन सुरक्षित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

याप्रसंगी आरोग्य सभापती भालचंद्र कांबळे, नगरसेवक संजय भिंगारदेवे,प्रभारी आरोग्य निरीक्षक संदीप वाघमारे, अर्जुन सूर्यवंशी,नितीन चंदनशिवे, सुहास सकटे, बबलू गुरव, दिपक सातपुते, अभि गायगवळे, सुरज मंडले, महेश झाडे, अभिजित ममदापुरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *