महाराष्ट्रभर यात्रेचे आयोजन : ऍड चिमण डांगे
आष्टा ( तानाजी टकले ) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाच्या वतीने महाराष्ट्रभर “अहिल्या संदेश यात्रेचे”आयोजन करण्यात आले आहे. 13 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात यात्रा होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट चिमण डांगे यांनी दिली.
आष्टा (जिल्हा सांगली ) येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात राज्यातील 29 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची राज्यव्यापी बैठक झाली. माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम भाऊ फुंडे (शेगाव.) मल्हार सेना प्रमुख बबनराव रानगे, अलकाताई गोडे, मल्हार सेना प्रदेश उपसरसेनापती उमेश घुरडे (अमरावती ). अशोकराव देवकाते (शेगाव), अंकुशराव निर्मळ (बीड), मल्हार सेना सरचिटणीस संदीप तेले, छगन नांगरे, लक्ष्मण उघडे (अमरावती) ,चंद्रकांत बनसोडे, सांगली जिल्हा महिला अध्यक्ष सविताताई मदने, प्रकाश कनप प्रमुख उपस्थित होते.
चिमण डांगे म्हणाले, धनगर समाजाचा गौरवशाली इतिहास आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे वी जयंती ज्या उत्साहात साजरी झाली, त्याच उत्साहात पुण्यतिथी जन्मगाव चौंडी येथे साजरी करण्याचे राज्यव्यापी बैठकीत ठरलेआहे. आरक्षण हा महत्त्वाचा विषय आहेच, त्याबरोबर समाज संघटित करून समाज बांधवांना सामाजिक मुख्य प्रवाहात आणणे, जागृती करणे हे ही महत्त्वाचे आहे. याकरिता, अहिल्यादेवी पुण्यतिथी पासून महाराष्ट्रभर महासंघाच्या माध्यमातून “अहिल्या संदेश यात्रा” काढणार आहोत.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुका, शहरे, गाव, वाडी वस्तीपर्यंत संदेश यात्रा जाईल. आरक्षण त्याची माहिती, समाजाचा इतिहास, प्रमुख मागण्या सर्व माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हा उद्देश आहे. यात्रेमध्ये संदेश रथ, धनगर समाजाच्या इतिहासाची माहिती असेल. संदेश यात्रा प्रत्येक जिल्हा निहाय असेल. मिरवणुका शोभायात्रा समाज प्रबोधन व्याख्याने या माध्यमातून समाजजागृती केली जाईल. सांगली जिल्ह्यातील यात्रेची सुरुवात शिराळा तालुक्यातील मोरणा येथून होईल सर्व समाज बांधवांनी यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन डांगे यांनी केले. यावेळी व्यवस्थापक सुनील शिनगारे, प्राचार्य रघुनाथ बोते अजित पाटील, सुनील मलगुंडे उपस्थित होते