: पहिल्या नाही किमान शेवटच्या कॅबिनेट मध्ये तर धनगर आरक्षण प्रश्न सोडवावा
: विक्रम ढोणे यांची शासनाकडे मागणी
सांगली (प्रतिनिधी) भाजप – शिवसेना सरकारने 2014 साली धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला आता दहा वर्षे पूर्ण झाली हा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाचा विश्वासघात केल्याचे स्पष्ट झाले आहे, असा हल्लाबोल धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केला आहे.
संयोजक विक्रम ढोणे म्हणाले, 29 जुलै 2014 साली बारामती येथे धनगर समाजाचे आंदोलन सुरू होते. त्या आंदोलनाला पाठींबा देत तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समजाला विश्वास दिला. आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण प्रश्न निकाली काढतो राज्यातील धनगर समाज्याने भाजप शिवसेनेला एकहाती सत्ता दिली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर राज्यातील धनगर समाजाला आनंद झाला आणि धनगर आरक्षण प्रश्न सुटणार असा विश्वास निर्माण झाला. पण तिथेच धनगर सामजाचा विश्वासघात झाला आहे. ही धनगर समाजाची भावना झाली आहे. दहा वर्षे दिशाभूल करून वेळकाढूपणा करण्यात राज्य सरकार नियोजन करीत असते.
धनगर समाजाची एसटी (अनुसूचित जमाती) आरक्षणाची असताना देवेंद्र फडणवीस सरकारने अभ्यास समिती नेमून वेळकाढूपणा केला. त्यानंतर लोकसभा निवडणूक तोंडावर असताना 1000 कोटीची घोषणा केली पण प्रत्यक्षात आजही त्याची तरतूद केली नाही. त्यानंतर आरक्षण मिळेपर्यंत जे आदिवासींना ते धनगरांना अशा लोकप्रिय घोषणा करीत समाजाची दिशाभूल करीत राहिले. त्यानंतर न्यायालयात सरकारने सकारात्मक प्रतिज्ञापत्र दिले म्हणून 2024 च्या लोकसभा आचारसंहिता पर्यंत दिशाभूल केले आणि प्रत्यक्षात जे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले त्याचा धनगर आरक्षण प्रश्नांवर फायदा होण्याऐवजी धनगर समाजाचा तोटा झाला हे सिद्ध झाले आहे. आता शिंदे समिती नेमून पुन्हा वेळकाढूपणा करीत आहे. हा सर्व धनगर आरक्षणाचा प्रवास वेदनादायी आहे.
त्यामुळे शिंदे, फडणवीस, पवार सरकारने धनगर समाजाचा विश्वासघात केल्याची भावना झाली आहे. त्यामुळे पहिल्या कॅबिनेट मध्ये नाही किमान दहा वर्षातील शेवटच्या कॅबिनेटमध्ये तर हा प्रश्न सोडवावा अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल आणि विश्वासघात केलेल्या भाजपला राज्यातील धनगर समाज माफ करणार नसल्याचे धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी सांगितले.
यावेळी जत तालुका धनगर समाजाचे युवक जयाप्पा खरात, अशोक सलगर, तानाजी कटरे, विलास काळे, प्रशांत कटरे, पांडुरंग खरात, संतोष खरात, धोंडीबा खरात उपस्थित होते.