विटा ( प्रतिनिधी ) : माहुली येथील सांगली जिल्ह्याचे हद्द ते तासगाव तालुका हद्दीपर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. हे खड्डे मुजविण्यासाठी युवा नेते वैभव पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि झोपी गेलेले प्रशासन खडकन जागे होऊन खड्डे मुजविण्यासाठी रस्त्यावर धावत सुटले. या प्रकरणाची रंगतदार चर्चा सध्या सुरू आहे
येथील विटा तासगाव तसेच विटा माहुली या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाले आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावरील खड्डे मुजविणने गरजेचे होते. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाचे निर्ढावलेले अधिकारी यांनी रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून या रस्त्यांवरील खड्डे मुजविण्यासाठी आपल्या खास स्टाईल मध्ये सूचना आणि इशारा दिला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या अधिकाऱ्यानी कोणताही विलंब न लावता रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. वैभव पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळेच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मार्गी लागले. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
———————————
पण मुळात…
प्रशासन झोपते का ?
: वैभव पाटील यांनी त्यांच्या आक्रमक स्टाईल मध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारल्यामुळेच रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू झाले, हे आता समोर आले आहे. पण मुळात प्रशासन झोपते का ? रस्ता दुरुस्ती सारख्या कामाला देखील नागरिकांनी किंवा नेते मंडळींनी या अधिकाऱ्यांना जागे का करावे लागते ? असा सवाल विचारला जात आहे.