बाबर है तो मुमकिन है…महापुराचे पाणी थेट दुष्काळी राजेवाडी च्या तलावात; पहा कसे ?

सांगली (राजेंद्र काळे) : सातारा आणि सांगली जिल्ह्यातून वाहून जाणारे कृष्णा नदीच्या पुराचे अतिरिक्त पाणी उरमोडी किंवा जिहे कठापूर योजनेमधून राजेवाडी तलावात सोडा अशी मागणी शिवसेनेचे युवा नेते सुहास बाबर यांनी केली आणि या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत येत्या आठवडाभरात पुराचे अतिरिक्त पाणी राजेवाडी तलावात पोहोचेल अशी ग्वाहीच सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.

आटपाडी व सांगोला तालुक्याला वरदान ठरणारा राजेवाडी तलाव संपुर्णपणे कोरडा पडलेला आहे. पुराचे वाहुन जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळविले तर येथील शेतक-यांना त्याचा फायदा होणार आहे.

महायुती सरकारने गेल्या पाच वर्षाच्या काळात स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचा शब्द नेहमीच प्रमाण मानला. अनिलभाऊ यांच्या मागणीप्रमाणे मतदार संघात विक्रमी निधी मिळाला. तसेच आमदार बाबर यांच्या निधनानंतर देखील महायुती सरकारने सुहास बाबर यांना भरघोस पाठबळ दिले. गेल्या सहा महिन्यात कोणतेही पद नसताना सुहास बाबर यांच्या मागणीनुसार मतदार संघाला 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी मिळाला. तर नुकतेच थेट मुख्यमंत्र्यांनीच विटा शहराच्या पाणी योजनेसाठी सह्याद्रीवर बैठक आयोजित करत 87 कोटी रुपयांचा निधी मंजूर करत असल्याचे जाहीर केले.

आता सुहास बाबर यांनी महायुती सरकारकडे मागणी करावी आणि सरकारने ती क्षणाचाही विलंब न लावता मंजूर करावी असा जणू ट्रेंडच निर्माण झाला आहे. नुकतीच सुहास बाबर यांनी महापुराचे अतिरिक्त पाणी  उरमोडी किंवा जिहे  कठापुर योजनामधून राजेवाडी (म्हसवड) तलावात पाणी सोडावे, अशी मागणी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केली. यासंदर्भात सुहास बाबर यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेऊन हे निवेदन दिले व यावर तात्काळ कार्यवाही व्हावी अशी आग्रही मागणी केली.

या निवेदनात त्यांनी खानापूर मतदारसंघातील व्यथा मांडली. सध्या प्रचंड पाऊसामुळे सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. परंतु माझ्या  खानापूर मतदारसंघातील आटपाडी तालुक्याच्या पूर्व व उत्तर भागात पाऊस कमी झाल्याने दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आटपाडी व सांगोला तालुक्याला वरदान ठरणारा राजेवाडी तलाव संपुर्णपणे कोरडा पडलेला आहे. काही गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सातारा जिल्ह्यात सद्या मुसळधार पाऊस पडून नद्यांना पुर आलेला आहे. पुराचे वाहुन जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळविले तर येथील शेतक-यांना त्याचा फायदा होणार आहे. सदर वाहुन जाणारे पाणी उरमोडी व जिहे कठापूर योजनेतून दिल्यास पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तरी राजेवाडी तलावात पुराचे वाहुन जाणारे पाणी (उरमोडी योजना किंवा जिहे कठापुर योजना) सोडणेबाबत आपणांकडून संबंधितांना आदेश व्हावेत, अशी मागणी केली.

या मागणीनंतर पालक मंत्री शंभूराजे देसाई यांनी तात्काळ साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी आणि अधीक्षक अभियंता श्री नाईक यांच्याशी संपर्क साधून पुराचे पाणी राजेवाडी तलावात सोडण्याबाबत सूचना केल्या. येत्या आठवड्यात पाणी राजेवाडी तलावात येईल अशी ग्वाही शंभूराजे देसाई यांनी दिली.

बाबर है तो मुमकिन है…
सातारा सांगली जिल्ह्यामधून वाहून जाणारी महापुराचे अतिरिक्त पाणी थेट दुष्काळी आटपाडी तालुक्याला वरदान ठरणाऱ्या राजेवाडी तलावात नेणे ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. मात्र इथल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री शंभूराजे देसाई यांनी पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. अर्थातच, आपल्या दुष्काळी भागाची व्यथा समर्थपणे मांडून महापुराचे पाणी खेचून आणणाऱ्या सुहास बाबर यांचे देखील मतदार संघातून अभिनंदन होत आहे. त्यामुळेच आता बाबर है तो मुमकिन है… अशी कौतुकाची थाप सुहास बाबर यांना मिळत आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *