हुतात्माचे रोलर पूजन आणि वैभवकाकांचे आवाहन; पहा काय म्हणाले,


वाळवा ( रहीम पठाण ) : चालू गळीत हंगाम पुर्ण क्षमतेने यशस्वी करण्यासाठी कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न करावा, असे आवाहन पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर कारखान्याचे चेअरमन वैभवकाका नायकवडी यांनी केले.

नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर कारखान्याचा गळीत हंगाम 2024- 25 करीताचा “रोलर पूजन” समारंभ आज  31 रोजी संपन्न झाला. यावेळी चेअरमन मा.वैभवकाका बोलत होते.

वैभव काका म्हणाले, कारखान्यातील  मेटेनन्सची कामे प्रगतीपथावर आहेत. येणाऱ्या गळीत हंगामामध्ये अडचणी येऊ नयेत त्यादृष्टीने काम करावे. ऊस गळीताचा रेट जादा रहाणेचे दृष्टीने जरुर ते नियोजन करावे. शेती खात्याने त्यांच्या ऊस नोंदी पुर्ण केल्या आहेत. गाळप परवाना घेणेचे दृष्टीने त्यांचे कामकाज चालू आहे. आवश्यक असणारे ऊस तोडणी वाहतूकीचे सर्व करार व त्यांची तपासणी  पुर्ण करुन त्यांना ॲडव्हान्स रक्कम सुध्दा वाटप केली आहे. यावर्षी गळीत हंगाम यशस्वी करणेसाठी संपूर्ण ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा हजर रहाणे आणि 1 फेब्रुवारी नंतर रिकव्हरी जादा असणाऱ्या कालावधीत ऊस पुरवठा कमी न होता पुर्ण क्षमतेने होणेकरिता खबरदारी घ्यावी.

कारखान्यात बगॅस व वाफेची बचत होणेकरिता व वीज निर्मितीमध्ये वाढ होणेसाठी आधुनिकी तंत्रज्ञानावर आधारीत मशिनरी बसविणेचे काम कारखान्यात चालू आहे. येत्या सिझनमध्ये सदर मशिनरी कार्यान्वीत होऊन बगॅसमध्ये मोठी बचत होईल, असे मत नायकवडी यांनी व्यक्त केले.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन रामचंद्र भाडळकर, आजी- माजी संचालक, कार्यकारी संचालक समीर सलगर, हुतात्मा शिक्षण व उद्योग समुहातील पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *