सांगली ( प्रतिनिधी ) बामणोली गावातील विकास कामांसाठी आ. सुधीर गाडगीळ यांच्या माध्यमातून ३ कोटी ८८ लाखाचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या माध्यमातून बामनोलीत विकास कामांचे नवे पर्व सुरू झाले आहे, असे गौरवउद्गार सरपंच सौ. गीताताई चिंचकर यांनी काढले.
आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या निधीतून मंजूर झालेल्या विकास कामांचा शुभारंभ सरपंच सौ. गीताताई सुभाष चिंचकर यांच्या हस्ते झाला. या विकास कामांमध्ये प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर व परिसर विकसित करणेसाठी २ कोटी ३८ लाख यापैकी भैरवनाथ मंदिर परीसरा मध्ये पथदिवे लावणे ३४ लाख या कामाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच नागरी सुविधा योजनेमधून वार्ड क्र २ मध्ये बंदिस्त गटर करणे १६ लाख ६६ हजार , जनसुविधा योजने मधून वार्ड क्र २ मध्ये अंतर्गत रस्त्यास १६ लाख, ग्राम विकास निधी २५- १५ अंतर्गत ३० लाख २२ हजार असे एकूण मंजूर निधीच्या कामांचा शुभारंभ पार पडला.
बामणोली गावास पुनर्वसन होऊन ६० वर्षे झाले. प्रथमच ग्रामदैवत श्री. भैरवनाथ मंदिर व परिसर सुशोभीकरणासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मंजूर करून आणला यामध्ये श्री. भैरवनाथ मंदिराचे वॉल कंपाऊंड, वॉकींग ट्रॅक, भाविकांना बसणेसाठी स्टील बाकडे, स्वच्छता गृह, भक्त निवास,मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे. व मंदिराकडे जाणारे रस्ते करण्यात येणार आहेत.
या कामाच्या शुभारंभ प्रसंगी सुभाष चिंचकर, उपसरपंच विष्णू लवटे, सर्व ग्रा. प. सदस्य राजेश सन्नोळी, दिग्विजय चिंचकर, किरण भोसले, संतोष सरगर, भीमराव रुपनर, अमित आवळे, सौ. संगीता पाटील, अर्चना पाटील , स्वरूपा वारणकर, रुपाली यमगर, स्नेहल व्हनसुरे, मालन गायकवाड, प्रियांका बामणे, अनिता जाधव, माजी उपसरपंच संजय मोटे व भैरवनाथ मंदिर ट्रस्टी बाबुराव शिंदकर, रमेश शिंदकर, शशिकांत शिंदकर,संदीप शिंदकर, सतीश शिंदकर, राम शिंदकर, श्रीकांत शिंदकर, दत्तात्रय जांभळे, सदाशिव माळकुटे इ मान्यवर उपस्थित होते.
या कामांचा पाठपुरावा ग्रा. पं. सदस्य किरण भोसले यांनी केला.