वाळवा ( रहीम पठाण ) : परमपूज्य विश्वचैतन्य सद्गुरु नारायण तथा अण्णा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि पूज्य टेंबे स्वामी यांच्या मार्गदर्शनाखालील श्री दत्त जयंती निमित्त नारायणपूर येथे पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. इस्लामपूर येथील दिंडीतील या सहभागी भाविक आणि सेवेकरी यांचा संयुक्त भव्य आनंदोत्सव सोहळा वाळवा येथे ३ जानेवारी रोजी साजरा होणार आहे.
याप्रसंगी सद्गुरू पूज्य टेंबे स्वामी महाराज आणि सर्वांचे मार्गदर्शक श्री भरत (नाना) हे उपस्थित असणार आहेत. या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन इस्लामपूर येथील शिष्यगणांच्या पुढाकाराने केले आहे. तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी यांनी मोठ्या संख्येने सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री दत्त सेवेकरी मंडळ, इस्लामपूर ग्रुप यांच्यावतीने करण्यात आले आहे.