विटा ( प्रतिनिधी ) : अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गार्डी ( ता. खानापूर) येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी विटा पोलिसांनी कुशल दशरथ निंबाळकर (वय 19 रा. गार्डी, ता. खानापुर जि. सांगली) या नराधमास बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवार दिनांक 4 रोजी फिर्यादीची पिडीत मुलगी गार्डी येथे तिच्या घरात एकटी होती. यावेळी नराधम कुशल दशरथ निंबाळकर हा
त्याचा गैरफायदा घेत बळजबरी ने घरात घुसला. सदर पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असताना घरात घुसुन घराचे दरवाजास आतुन कडी लावली. पिडीतेला मिठी मारून माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणू लागला. मात्र पिडीतेने त्यास माझे तुझ्यावर प्रेम नाही, मला सोड असे म्हणुन पिडीत मुलगी ओरडली व तिने विरोध केला. मात्र आरोपीने तिचेशी जबरदस्तीने शारिरीक संबंध करुन तो घरातुन निघुन गेला.
त्यानंतर पिडीतेची प्रकृती बिघडल्याने प्रथम तिला विटा येथे व नंतर कराड येथे उपचारासाठी दाखल केले. याबाबत विटा पोलिसात आरोपी कुशल दशरथ निंबाळकर (वय 19 रा. गार्डी, ता. खानापुर जि. सांगली) याच्या विरोधात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विटा पोलिसांनी आरोपी कुशल निंबाळकर यास अटक केली आहे.