विटा (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ॲाफ विटा सिटीच्या २०२४-२५ या वर्षासाठी नुतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी संपन्न झाला. अध्यक्षपदी अमोल माने, सचिवपदी रोहीत दिवटे तर खजिनदारपदी पराग महाजन यांची एकमताने निवड करण्यात आली. या सोहळ्याच्या अध्यक्षपदी माजी सहाय्यक प्रांतपाल मल्लिकार्जुन बड्डे व नुतन सहाय्यक प्रांतपाल अभय गुळवणी उपस्थिती होते.
या प्रसंगी विटा परीसरातील वीमा व्यावसायीक प्रविण पाटील, बस चालक निवास थोरात व हॅाटेल व्यावसायीक श्रीमती पल्लवी पेटकर यांना विशेष व्यवसाय सेवा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले तर अल्ट्रा फिट इंडिया मिशनचे संग्राम कणसे, सर्पमित्र विजय सुर्यवंशी पत्रकार व सामाजीक कार्यकर्ते सिराज शिकलगार यांना विशेष समाज गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
रोटरीचे मावळते अध्यक्ष अमृतराव निंबाळकर यांनी आपल्या स्वागत पर मनोगतामध्ये गेल्या वर्षभरामध्ये राबविलेल्या विविध समाजउपयोगी अनेक उपक्रमांची माहिती देऊन नुतन पदाधिकाऱ्यांकडे धुरा सुपुर्द केली. गुळवणी यांनी समाजातील आहे रे व नाही रे या दोन वर्गातील सेतुबांधणीचे काम आंतरराष्ट्रीय रोटरीने गेल्या अनेक वर्षापासुन केले असुन यापुढे हे कार्य आणखी व्याप्तीने व्हावे, यासाठी विटा रोटरीने प्रयत्न करावेत असे सांगितले. मल्लिकार्जन बड्डे यांनी आपल्या मनोगतामध्ये विटा रोटरी परीवाराच्या वतीने गेल्या वीस वर्षापासुन राबवीलेल्या रक्तदान,अपंगासाठी सायकली,जयपुरफुट, विश्रांती बेंच, शिक्षक दिन , वापरण्यायोग्य चांगल्या कपड्यांचे वितरण, महाविद्यालयांना पुस्तक प्रदान, विविध प्रबोधनपर व्याख्याने, विविध शाळांना शुद्ध पाणी यंत्रणा,डिजीटल क्लासरूम, वृक्षारोपण,शहर स्वच्छता अभियान यासारख्या विविध समाजउपयोगी उपक्रमांच्या सात्तत्याबद्दल कौतुक केले.
२३० देशातील १२ लाख रोटरी सदस्यांच्या माध्यमातुन जागतिक रोटरीच्या वतीने जगातून पोलिओ हटवाण्यासाठीचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविला जात असुन यासाठी रोटरीने आजपर्यंत करोडो रुपयांचे योगदान दिले आहे. सद्यस्थितीमध्ये जगभरात केवळ मोजके पोलिओ रुग्ण आढळले असुन नजिकच्या काळात रोटरीने पाहिलेले पोलिओमुक्त जगाचे स्वप्न साकार होणार आहे. जागतिक रोटरीने शिक्षण, आरोग्य, जागतीक शांतता व पर्यावरण या विषयांवर आपले लक्ष केंद्रीत करुन काम सुरु ठेवल्याचे सांगितले.माजी सहाय्यक प्रांतपाल तानाजी बोराडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
नुतन अध्यक्ष अमोल माने यांनी निवडीबद्दल आभार मानुन येणाऱ्या वर्षात रोटरीच्या परंपरेस साजेसे काम करु अशी ग्वाही दिली. यावेळी संतोष तारळेकर, दर्शन चोथे, पाटील, मनिष मुळे व प्रविण पाटील या नुतन सदस्यांचे रोटरी परीवारात स्वागत करण्यात आले.
यावेळी विटा रोटरीचे संस्थापक किरण तारळेकर प्रविण दाते, लक्ष्मणराव जाधव, डॅा.रामचंद्र नलवडे, नितीन पुणेकर, अमोल माने, सुधिर बाबर, प्रफुल्ल निवळे, संदीप गायकवाड, डॅा.अविनाश लोखंडे, डॅा. सुशांत वलेकर, रमेश लोटके, मन्सुर पटेल, मिलिंद चोथे, सागर लकडे, अमित आहुजा, संदिप पाटील, सागर म्हेत्रे, अमृतराव निंबाळकर, विकी आहुजा, विपुल शहा, अनिल देशमुखे, अनुप पवार, सचिन भंडारे सदस्यांची परिवारासह उपस्थिती होती. सुत्रसंचालन अनिल देशमुखे व प्रविण दाते यांनी केले.आभार प्रदर्शन रोहीत दिवटे यांनी केले.