विटा (प्रतिनिधी) : मिरज विभागीय झोन कमीटीच्या माध्यमातुन, देशांतर्गत अंडी उत्पादन, निर्यात व देशांतर्गत मागणी बाबतचा अभ्यास करुन दररोज सकाळी ११.३० वाजता एकमताने अंडी दर जाहीर केला जाईल. सर्व व्यावसायिक व अंडीव्यापाऱ्यांनी या दरानुसार कामकाज करावे, असा ठराव मिरज झोन मधील कुक्कुटपालन व्यवसायिकांच्या बैठकीत घेण्यात आला.
देशपातळीवरच्या कुक्कुट व्यावसायिकांची प्रातिनिधीक संस्था असलेल्या राष्ट्रीय अंडी समन्वय समिती अर्थात एनईसीसीच्या मिरज झोनमधील व्यवसायिकांची बैठक विटा येथे पार पडली. याबाबत माहिती देताना किरण तारळेकर म्हणाले, एनईसीसीचा मिरज झोन हा कोल्हापुर , सांगली व सातारा जिल्ह्यातील कुक्कुटव्यावसायिकासाठी निर्माण करण्यात आला आहे. मिरज विभागीय झोन कमीटीच्या माध्यमातुन, देशांतर्गत अंडी उत्पादन, निर्यात व देशांतर्गत मागणी बाबतचा अभ्यास करुन अंडी दराबाबत समन्वय राखला जात असतो. या अनुषंगाने आज झालेल्या बैठकीमध्ये मिरज झोनमधील व्यावसायिकांच्या विविध अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने अंडी दराबाबतची संदिग्दता दुर होऊन पुर्ण मिरज झोनचा एकच सर्वमान्य अंडी दर दररोज जाहीर व्हावा असा ठराव करण्यात आला. या साठी झोनमधील विविध ठिकाणचे अंडी उत्पादक कुक्कुटव्यावसायीक व अंडी व्यापाऱ्यांचा समावेश असलेली तेरा सदस्यांची समिती स्थापण करण्यात आली. ही समिती बाजारपेठेची परिस्थिती अवलोकन करुन दररोज सकाळी ११.३० वाजता एकमताने अंडी दर जाहीर करेल व सर्व व्यावसायिक व अंडीव्यापाऱ्यांनी या दरानुसार कामकाज करावे असा ठराव सर्वसहमतीने करण्यात आला.
या बैठकीस समन्वय समितीचे समन्वयक सी. वसंतकुमार मिरज, किरण तारळेकर, झोन अध्यक्ष संजय पाटील,उपाध्यक्ष प्रशांत भोसले, सचिव वाय. आर. पाटील ,लक्ष्मणराव पाटील, शरद रावताळे, धनाजी देवकर, सुखदेव पाटील, मुकुंद लकडे, सचिन गायकवाड, अय्याज मुल्ला, संजय रावताळे, रमेश होनराव, विक्रम फारणे कोल्हापुर,सागर म्हेत्रे , जयंत पाटील, चंद्रकांत जाधव, दिलीप डिसले, शिवाजी निंबाळकर कोल्हापुर, या अंडी उत्पादकांसह शहाजी गडदरे, निलेश राठोड, आयलेशकुमार, महंमद बागवान मिरज हे अंडी व्यापारी व परीसरातील कुक्कुटव्यावसायिक उपस्थित होते.