कडेगाव / प्रतिनिधी : अमरापूर, ता. कडेगाव येथील ताकारी कॅनॉल वरील श्रीरंग मोरे वस्ती ते एकनाथ दादा वस्ती पासुन तोंडोली येथे जाणाऱ्या रस्त्यावर लगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांची जाणे येणेसाठी फार मोठी गैरसोय होत आहे. सदर रस्त्याचा हद्दी कायम करून रस्ता खुला करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करावी, अन्यथा १९ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन अमरापूर ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले
यावेळी अमरापूरच्या लोकनियुक्त सरपंच सुनीता गढळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल शिंदे, महादेव रुपनर, वंदना शिंगटे, शुभांगी अंबवडे, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश गडळे, नामदेव पाटील, नानासो मोरे आनंदा पाटील, संतोष शिंगटे, धनाजी रुपनर, ऋतुजा रुपनर, संभाजी मोहिते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.